किसान महापंचायत मुझफ्फरनगर : ३०० शेतकरी संघटनांचा सामूहिक एल्गार | पुढारी

किसान महापंचायत मुझफ्फरनगर : ३०० शेतकरी संघटनांचा सामूहिक एल्गार

मुझफ्फरनगर; पुढारी ऑनलाईन : किसान महापंचायत मुझफ्फरनगर : किसान महापंचायत सुरू होण्यापूर्वीच, जीआयसी मैदान सकाळी १० वाजता पूर्णपणे भरले आहे. पंजाब, हरियाणा ते दक्षिण भारतातील शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आवाज बुलंद करण्यासाठी आले आहेत.

मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये सर्वांची नजर या किसान महापंचायतीवर आहे. हे शेतकऱ्यांचे मिशन यूपी सुरू करण्याचे संकेत म्हणूनही मानले जात आहे. नरेश टिकैत, राकेश टिकैत, मेधा पाटेकर, योगेंद्र यादव यांच्यासह अनेक मोठे नेते तेथे उपस्थित आहेत.

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी संकेत दिले आहेत की, मुझफ्फरनगर नंतर, यूपीच्या इतर तालुका आणि जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची अशीच महापंचायत आयोजित केली जाऊ शकते, जेणेकरून यूपी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना एकत्र आणता येईल.

मुजफ्फरनगरमधील किसान महापंचायतीसंदर्भात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने दीर्घकाळ मेहनत घेतली आहे. केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी शेतकरी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून करत आहेत.

केंद्र यासाठी तयार नाही. केंद्र आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यातील चर्चाही बऱ्याच काळापासून झालेली नाही.

शेतकरी नेते महापंचायतीमध्ये त्यांच्या मागण्यांबाबत काय घोषणा करतात हे पाहणे मनोरंजक असेल. कृषी कायद्यांव्यतिरिक्त, शेतकरी नेत्यांनी वीज दुरुस्ती विधेयक आणि सार्वजनिक मालमत्तेतून कमाईचा मुद्दाही उपस्थित केला आहे.

शेतकरी नेते सतत सांगत आहेत की ते कृषी कायद्यांविरोधात अनिश्चित काळासाठी लढाई लढण्यास तयार आहेत.

राकेश टिकैत यांनी शेतकरी चळवळीबद्दल सांगितले होते की, कृषी कायदे परत येईपर्यंत घरी परतणार नाही.

संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांच्या विनंतीवरून तो मुझफ्फरनगरला जात असले तरी ते त्यांच्या घरी जाणार नाहीत.

हे ही वाचलं का?

Back to top button