नागरिकांना लस टोचण्यापूर्वी खात्री करा! मोदी सरकारचा राज्यांना इशारा | पुढारी

नागरिकांना लस टोचण्यापूर्वी खात्री करा! मोदी सरकारचा राज्यांना इशारा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : नागरिकांना लस टोचण्यापूर्वी खात्री करा : कोरोना महारोगराईचा सामना करण्यासाठी देशात लसीकरण अभियानाला वेग देण्यात आला आहे. अशात याचा गैरफायदा घेत आर्थिक फायद्यासाठी काहींकडून बनावट लसीं बाजारात आणण्याचा धोका आहे.

या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या बनावट लसींसंबंधी केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांना लस टोचण्यापूर्वी ती बनावट तर नाही? याची खातरजमा करून घेण्याची सूचना केंद्राने राज्यांना दिले आहेत.

दक्षिण-पूर्व आशिया तसेच आफ्रिकेत बनावट कोव्हिशील्ड लस आढळून आल्याने खबरदारी म्हणून केंद्राकडून राज्यांना यासंबंधीचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांना लस टोचण्यापूर्वी खात्री करा

विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने बनावट लशींसंबंधी अलर्ट देखील जारी केला आहे. खऱ्या लशीच्या कुप्यांची ओळख कशी पटवायची, यासंबंधीची माहिती केंद्राकडून राज्यांना पाठवण्यात आली आहे. यानूसार लस खरी आहे अथवा खोटी यासंबंधी कळू शकेल.

कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन तसेच स्पुटनिक-व्ही लसीचे आवरण, त्याचा रंग , ब्रॉन्ड नाव यांसंबंधीची विस्तृत माहिती त्यातून देण्यात आली आहे. सरकारच्या दिशानिर्देशाचे प्रत्येक लसीकरण केंद्रावर पालन करण्यात यावेत,अशा सूचना केेंद्राने पत्रातून दिल्या आहेत.

लसीकरण अभियानातून आतापर्यंत देशात ६८ कोटी ४६ लाखांहून अधिक डोस लावण्यात आले आहे. केंद्र सरकारने पूर्वेकडील राज्य, केंद्रशासित प्रदेशांना देखील कोरोना लसीकरणासंबंधी नवीन दिशानिर्देश दिले आहेत.

६० वर्षांवरील नागरिकांचे लवकरात लवकरच लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

अनेक राज्यातील लसीकरणाच्या वेगावर केंद्राकडून असमाधान व्यक्त करण्यात आले आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button