‘कोल्‍हापूर जिल्‍ह्यात १५ ऑक्‍टोबर पासून तिसरी लाट तीव्र होण्याची भीती?’ | पुढारी

'कोल्‍हापूर जिल्‍ह्यात १५ ऑक्‍टोबर पासून तिसरी लाट तीव्र होण्याची भीती?'

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्‍हापूर जिल्‍ह्यात तिसरी लाट 15 ऑक्टोबर पासून तीव्र होण्याची भीती आहे. आज (सोमवार) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. तिसऱ्या लाटेसाठी आवश्यक ती यंत्रणा सज्ज करण्यात येत असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात तिसरी लाट एका दिवसातील रुग्ण संख्या 29 हजारापर्यंत जाऊ शकते, अशी शक्यताही यावेळी व्यक्त करण्यात आली. नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये घराबाहेर पडू नये. लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार घ्यावेत.

त्यामध्ये दिरंगाई करू नये, असे आवाहन ही पाटील यांनी केले. प्रत्येक तालुक्यात ऑक्सीजन बेड उपलब्ध होतील. यानुसार नियोजन केले जात आहे.

त्यासह सीपीआर, आयजीएम, इचलकरंजी व गडहिंग्लज येथे 120 बेडचे पीडियाट्रिक युनिट तसेच अतिरिक्त 90 बेड्सचे पीडियाट्रिक आयसीयू युनिट सुरू केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्यांनी एकही डोस घेतलेला नाही, त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले असून आजार असलेल्या मुलांच्या पालकांना लस देण्यास प्राध्यान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचलात का ? 

Back to top button