कोल्हापूर: शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी सुजित चव्हाण, रवींद्र माने | पुढारी

कोल्हापूर: शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी सुजित चव्हाण, रवींद्र माने

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुखपदी सुजित चव्हाण व रवींद्र माने यांची निवड करण्यात आली आहे. चव्हाण यांच्याकडे कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण व करवीर विधानसभा मतदारसंघाची, तर माने यांच्याकडे हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडीशिरोळ, इचलकरंजीची जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व खा.धैर्यशील माने यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोघेही जिल्हाप्रमुख शिवसेनेचे काम करणार आहेत. चव्हाण हे पूर्वी जिल्हा उपप्रमुख होते. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष आहेत. चव्हाण यांचे वडील कै. रामभाऊ चव्हाण हेसुद्धा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. माने यांनी इचलकरंजी नगरपालिकेत तीनवेळा नगरसेवकपद भूविले आहे.

मराठा महासंघाचे ते प्रमुख कार्यकर्ते आहेत. क्षीरसागर म्हणाले, मुंबईतील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी नियुक्ती झाली आहे. त्यानंतर शिवसेना पदाधिकार्‍यांच्या नव्याने निवडी केल्या जात आहेत. लवकरच आणखी एक जिल्हाप्रमुख आणि शहरप्रमुखांच्या निवडी जाहीर केल्या जाणार आहेत.

Back to top button