टोप-संभापूरला गव्याचा ठिय्या | पुढारी

टोप-संभापूरला गव्याचा ठिय्या

टोप/कासारवाडी ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी, टोप शेतवडीत गव्याचे वास्तव्य असल्याचे आढळून येत असतानाच आज सकाळी तासगावमध्ये नागरिकांना दिसलेेला हा गवा संभापूरमध्ये चिन्मय गणाधीश आवारात दिवसभर तळ ठोकून बसला असून नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी आणि शनिवारी हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव परिसरात वावरणारा एक पूर्ण वाढ झालेला गवा तासगावच्या डोंगर परिसरातून रविवारी सकाळी टोप-संभापूर येथील चिन्मय गणाधीशच्या मागील बाजूस तारेचे कंपाऊंड पार करून आवारात प्रवेश केला. दिवसभर गव्याने ठिय्या मांडला.

गवा आल्याची बातमी सोशल मीडियाद्वारे वायरल झाली. संभापूर आणि टोप मधील नागरिकांनी तिकडे धाव घेतली. तत्काळ वन विभागाचे वनपाल साताप्पा जाधव, वनसेवक पुंडलिक खाडे, कृष्णात दळवी, प्राणी मित्र अमोल चव्हाण, रेस्क्यू टीम, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले. गवा चिन्मय गणाधीशी आवारातील झाडीत दिवसभर बसला आहे .

रविवारी शेजारीच असलेल्या गंधर्व पार्कला व चिन्मय गनाधिशाच्या दर्शनास नागरिकांची नेहमीच गर्दी असते. पण आज दिवसभर या परिसरात रेस्क्यू टीम एम आय डी सी शिरोली पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित असून संध्याकाळी गाव्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे

Back to top button