पुढारी आरोग्य संवाद : ‘निरोगी हृदयाची गुरुकिल्ली’ या विषयावर डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांचे आज व्याख्यान | पुढारी

पुढारी आरोग्य संवाद : ‘निरोगी हृदयाची गुरुकिल्ली’ या विषयावर डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांचे आज व्याख्यान

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘पुढारी’ समूहातर्फे दि. २ ते ४ जुलै दरम्यान ‘आरोग्य संवाद’अंतर्गत ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. हृदयविकार, कर्करोग हे आजार, उपचार तसेच हे आजार उद्भवू नयेत म्हणून अंगीकारण्याची आयुर्वेदिक जीवनशैली, याबाबतचे त्रिसूत्री मार्गदर्शन या तीन दिवसीय व्याख्यानमालेतून उपलब्ध होणार आहे. जागतिक स्तरावर कीर्ती मिळविलेल्या डॉक्टरांचा सहभाग, हे ‘पुढारी आरोग्य संवाद’ या व्याख्यानमालेचे खास वैशिष्ट्य आहे.

आज व्याख्यानमालेचा प्रारंभ २ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता होईल. कन्सल्टंट कार्डियोलॉजिस्ट डॉ. ऋतुपर्ण शिंदे हे ‘निरोगी हृदयाची गुरुकिल्ली’ या विषयावर व्याख्यान असेल. हृदयविकार ही सध्या आरोग्याच्या क्षेत्रातील एक मोठी समस्या आहे. पूर्वी हा आजार एका विशिष्ट वयात व परिस्थितीत होत असे. आता हृदयविकाराने सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत, यावर त्याला निर्बंध कसे घालता येऊ शकतात, या दृष्टीने डॉ. शिंदे यांचे उद्बोधन उपयुक्‍त ठरणार आहे.

कोरोना व कोरोनानंतरच्या काळात आरोग्य हा सर्वाधिक कळीचा मुद्दा बनलेला आहे. काळाची गरज लक्षात घेऊन ‘पुढारी’ने दरवर्षी ‘डॉक्टर डे’चे औचित्य साधून ‘आरोग्य संवाद’ या ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन सुरू केले. कोरोना काळात खास सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे. दररोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत सलग तीन दिवस व्याख्यान असेल. डॉ. संदीप पाटील हे या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन करतील.

आरोग्यमय जीवन जगण्याच्या दृष्टीने व्याख्याने अत्यंत उपयुक्‍त व दिशादर्शक ठरणार आहेत. नागरिकांनी ही व्याख्याने पाहावीत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. व्याख्याने पाहण्यासाठी Pudharionline या फेसबुक पेजला लाईक करून सहभागी व्हा.

आरोग्य संवाद कार्यक्रम

२ जुलै ‘निरोगी हृदयाची गुरुकिल्ली’ डॉ. ऋतुपर्ण शिंदे (कन्सल्टंट कार्डियोलॉजिस्ट)

३ जुलै ‘आयुर्वेद आणि जीवन’ डॉ. परिक्षित शेवडे (विख्यात आयुर्वेद तज्ज्ञ)

४ जुलै ‘कशी कराल कॅन्सरवर मात?’ डॉ. नानासाहेब थोरात (‘मेरी-क्युरी फेलो’ ऑक्सफर्ड विद्यापीठ)
व्याख्याने पाहण्यासाठी pudharionline या फेसबुक पेजला लाईक करून सहभागी व्हा.

https://www.facebook.com/Pudharionline/

Back to top button