वारणा, कोडोली महाविद्यालयांचा 100 टक्के निकाल | पुढारी

वारणा, कोडोली महाविद्यालयांचा 100 टक्के निकाल

वारणानगर ः पुढारी वृत्तसेवा येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील इयत्ता 12 वी विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा 100 टक्के निकाल लागला आहे. कला शाखेचा 94.3 टक्के आणि व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचा 98.8 टक्के निकाल जाहीर झाला आहे. एकूण 976 पैकी 967 विद्यार्थ्यांनी भरघोस यश प्राप्त केले आहे. सरासरी निकाल 99.7 टक्के लागला. गुणानुक्रमे महाविद्यालयात प्रत्येक विभागातून पहिल्या तीन आलेल्या 12 गुणवंतांमध्ये 10 मुलींनी बाजी मारली. दोन विद्यार्थ्यांनी गुणानुक्रमे स्थान पटकावले आहे. एकूण निकालात टक्केवारीमध्येही 60 टक्क्यांहून अधिक विद्यार्थिनींनी सर्वोच्च श्रेणीचे गुण प्राप्त केले आहेत.

वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आ. डॉ. विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, कनिष्ठ विभाग उपप्राचार्य प्रा. एस. एन. शेख यांनी यशस्वी सर्वच विद्यार्थ्यांचे आणि गुणवंतांचे अभिनंदन केले. गुणानुक्रमे प्रत्येक विभागात पहिले तीन आलेले विद्यार्थी असे- विज्ञान शाखा – प्रतीक्षा केकरे, श्रेणी बुधले, प्रणाली नलवडे. कला शाखा – पूजा माळी, विवेक संकपाळ, स्वस्तिश्री बनसोडे. वाणिज्य शाख- पूजा कुंभार, तेजस्विनी पाटील, श्रेयाल आवळे. व्यवसाय अभ्यासक्रम विभाग – निदा महाबरी, सानिका मोहिते अमृता डोंबे.

वारणा पॅटर्न

‘विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल प्रवेशासाठी स्वतंत्र टॅलेंट बॅच सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत घेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास, नोट्स, व्याख्याने, सराव परीक्षा घेतली आहे. त्यामुळे वारणा पॅटर्न राबविण्यात यश मिळत असल्याचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी सांगितले.

येथील कोडोली हायस्कूल व भाई शं. तु. पाटील (आप्पा) ज्युनि. कॉलेजच्या बारावी विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली. कला विभागाचा निकाल 95.23 टक्के लागला. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचा निकाल 93.33 टक्के लागला. यात ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा निकाल 100 टक्के लागला. कोरोना काळातही विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन चिकाटीने अभ्यास करून यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अजिंक्य पाटील यांचे प्रोत्साहन, तर प्राचार्य एम. बी. बोरगे व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Back to top button