पाचवीचा वर्गच नसलेल्या शाळेत मुश्रीफ यांचे नाव कसे? : समरजितसिंह घाटगे | पुढारी

पाचवीचा वर्गच नसलेल्या शाळेत मुश्रीफ यांचे नाव कसे? : समरजितसिंह घाटगे

कागल : पुढारी वृत्तसेवा
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शाळेच्या दाखल्यामध्ये जन्मतारखेच्या नोंदीमधील तफावत असून पॅनकार्ड आणि शाळेचा दाखला यांच्यामध्ये जन्मतारखा वेगवेगळ्या आहेत. ज्या शाळेला पाचवीचा वर्ग नव्हता, अशा शाळेमध्ये पाचवीमध्ये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आता खोटे आणि बनावट दाखलेही शोधावे लागतील, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला आहे.

हिंदुराव घाटगे शाळेमध्ये ना. मुश्रीफ यांचा हसन साहेब असा उल्‍लेख करण्यात आलेला आहे. तर जन्माला आले त्याच वेळेला हसन साहेब असे नाव कसे? कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे मुख्याध्यापकांनी शाळा दाखला तयार केला आहे. 1953 चा जन्म दाखला गृहित धरला तर आठव्या वर्षी पाचवीमध्ये होते तर पहिलीमध्ये त्यांचे वय किती? असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. ना. मुश्रीफ यांचे ओरिजनल दाखले नसल्यामुळे सध्या चुकीची कागदपत्रे तयार केली जात आहेत. त्यामुळे ते अडचणीत येत आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Back to top button