भुदरगडचे वनक्षेत्रपाल किशोर आहेर यांचे निलंबन | पुढारी

भुदरगडचे वनक्षेत्रपाल किशोर आहेर यांचे निलंबन

गारगोटी : पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवन व रोपवाटिका कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी भुुदरगडचे वनक्षेत्रपाल किशोर आहेर यांच्या निलंबनाची घोषणा वन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी विधान परिषदेत केली. विधान परिषद सदस्य किशोर दराडे यांनी ही लक्षवेधी मांडली होती.

पंढरपूर येथील सामाजिक वनीकरण विभागातील रोपवन व रोपवाटिका कामांतर्गत 16 गावांत वृक्षलागवड करत असताना तत्कालीन वनक्षेत्रपाल किशोर आहेर यांनी हात किंवा पाय नसलेल्या मजुरांच्या नावे धनादेश काढून या कामात कोट्यवधी रुपयांचा भ—ष्टाचार केला असल्याची लक्षवेधी अपक्ष आ. किशोर दराडे यांनी मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना वन राज्यमंत्री भरणे यांनी, आहेर यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, विधानपरिषद सदस्य दराडे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना तातडीने निलंबित करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.

Back to top button