रायगड: पाबळ येथे सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू | पुढारी

रायगड: पाबळ येथे सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू

पेण; पुढारी वृत्तसेवा : पेण तालुक्यातील बरडावाडी पाबळ येथील निगडा नदीत पोहताना दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१७) दुपारी ३ च्या सुमारास घडली. इलान बेन्झमीन वासकर (वय २५), व इझरायल बेन्झमीन वासकर ( वय २३, रा. थेरोंडा, रेवदंडा, जि. अलिबाग) अशी भावांची नावे आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी शोध घेऊन या दोघांचे मृतदेह बाहेर काढले.

याबाबत अधिक माहिती अशी की, अलिबाग तालुक्यातील थेरोंडा, रेवदंडा येथून चौघे जण बरडावाडी पाबळ येथे आले होते. यातील चौघे जण आज दुपारी ३ च्या सुमारास नदीच्या पाण्यात उतरले होते. यातील दोघे सख्खे भाऊ पाण्याच्या लाटेत वाहून गेले. वढखल पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तत्काळ ते घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ व तरुणांनी पाण्याच्या प्रवाहात त्यांचा शोध घेतला असता त्यांचे मृतदेह काही अंतरावर सापडले. पेणच्या सरकारी रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अधिक तपास वडखल पोलीस करत आहेत.

आंबा नदीत एक जण वाहून गेला, ४८ तासांतरही शोध सुरू

पेण तालुक्यातील आंबा नदीत रविवारी रात्री एक मच्छिमार वाहून गेला. कोलाड येथील रेस्क्यू टीम चोळे येथून वाढखल येथील नदीच्या पात्रात त्याचा शोध घेतला जात आहे. पेण तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार महेंद्र किसन कांबळे (वय ४४, मूळ रा.खार, ता. रोहा) असे बुडालेल्या मच्छिमाराचे नाव आहे. ४८ तासानंतरही त्याचा शोध लागलेला नाही.

हेही वाचा 

Back to top button