रायगड : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पनवेल-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा | पुढारी

रायगड : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पनवेल-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा

पनवेल ; पुढारी वृत्‍तसेवा गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या खूप जास्त असते. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे चाकरमान्यांना खडतर प्रवास करावा लागतो. परंतु कोकणात जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास कमी खडतर आणि सुखकर व्हावा यासाठी आता मुंबई-गोवा हायवेवरील सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे आज (शुक्रवार) मुंबई-गोवा हायवेच्या पाहणी दौऱ्यावर आहेत.

पनवेलनजीकच्या पळस्पे येथून हा दौरा सुरू झाला. पहिला टप्पा पनवेल ते कसू या 42 किमीची पाहाणी करण्यास सुरुवात केली आहे. या पहिल्या टप्प्यातील कामापैकी 12 किमी सिगल सिमेंट काँक्रिटीकरनाचे काम पूर्ण झाले आहे. त्याची पहाणी करून अधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्याच्या विशेष सूचना बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठेकेदार आणि अधिकारी यांना दिल्या. पहिल्या टप्यातील 42 किमीच्या सिगल सिमेंट काँक्रिटीकरनाचे काम गणेशोत्सवापर्यत पूर्ण होईल असा विश्वास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्‍त केला. पाहणी दौऱ्यादरम्यान मंत्री रवींद्र चव्हाण या संपूर्ण महामार्गावरील कामाची पाहणी करणार आहेत.

पावसात देखील शेल्टर लावून काम करणार : मंत्री रवींद्र चव्हाण

अडचणींचा असलेला पनवेल-गोवा महामार्गचे काम सुरू झाले आहे. या कामात पावसाचा मोठा व्यत्‍यय येत आहे. मात्र या पावसावर मात करून शेल्टर उभा करून काम पूर्ण करून घेण्याचा आमचा माणस असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

पांडापूर गावाजवळील खड्डे पाहून केली नाराजी व्यक्त..!

मुबई-गोवा महामार्गची पहाणी दौरा आज सकाळी पनवेल पळस्पे फाटा येथून सकाळी 7 वाजून 45 मिनिटाने सुरवात झाली. पळस्पे येथील सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याची पाहणी करून दौऱ्याला सुरवात केली. पहिला टप्पा पनवेल ते कासु या 42 किमीचे काम कधी पूर्ण होणार यांची विचारपूस करत सूचना देखील केल्या. या पहाणी नंतर त्यांचा ताफा पूढे जात असताना, त्यांचा ताफा नागोठणे जवळील पाडापूर गावाजवळ आला असता या महामार्गावर मोठे खड्डे पाहून मंत्री महोदयांनी ताफा थांबवला आणि खड्ड्याची पहाणी केली. यावेळी ठेकेदाराला बोलवून त्या बाबत विचारणा केली आणि खड्ड्या बाबत खडे बोल सूनावले. ठेकेदरांची कान उघडणी करत प्रथम खड्डे बुजवण्याचे आदेश दिले.

हेही वाचा : 

Back to top button