आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात | पुढारी

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात

खेड, पुढारी वृत्तसेवा : आमदार योगेश कदम यांच्या गाडीला शुक्रवारी (दि.०६) रात्री सव्वादहाच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चोळई येथे मागून येणा-या टँकरने जोरदार धडक दिली. रायगड हद्दीत झालेल्या या अपघात सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप बचावले आहेत. त्यांच्या चालकाला मात्र, किरकोळ दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून चोळई येथील शासकीय रूग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. रुग्णालयात आमदार योगेश कदम उपस्थित आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आमदार योगेश कदम शुक्रवारी रात्री खेडहून मुंबईला जाण्यास निघाले. कशेडी घाट उतरत असताना चोळई गावानजीक मागून येणा-या टँकरने आमदार कदम यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर टँकर चालक पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या ताफ्यातील पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करित आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button