Chief Justice DY Chandrachud : सरन्यायाधीश जेव्हा दोन दत्तक मुलींसह सुप्रीम कोर्टात येतात… | पुढारी

Chief Justice DY Chandrachud : सरन्यायाधीश जेव्हा दोन दत्तक मुलींसह सुप्रीम कोर्टात येतात...

नवी दिल्ली ः देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास आपल्या दोन दिव्यांग मुलींना घेऊन सर्वोच्च न्यायालयात पोहोचले तेव्हा तेथे उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. माही (16) आणि प्रियांका (20) अशी या मुलींची नावे आहेत. यानिमित्ताने उपस्थितांना चंद्रचूड यांच्यातील ‘बाबां’चे दर्शनही घडले. ते जणू या दोन्ही मुलींचे गाईडच बनले होते. (Chief Justice DY Chandrachud)

चंद्रचूड यांनी जिथून वकील आणि पक्षकार कोर्ट क्रमांक एकमध्ये जातात तिथूनच दोघींना व्हिलचेअरवरून सीजेआय कोर्ट रूम नंबर 1 मध्ये नेले. त्यानंतर कोर्टाचे काम कसे चालते, हेही या दोघींना दाखवण्यात आले. या दोघींना न्यायमूर्ती कुठे बसतात आणि वकील कोणत्या ठिकाणी युक्तिवाद करतात हे दाखवण्यात आले. नंतर चंद्रचूड हे त्या दोघींना घेऊन आपल्या चेंबरमध्ये गेले आणि त्यांना चेंबरही दाखवले. या दोन्ही मुली गेल्या काही काळापासून सर्वोच्च न्यायालय आपल्याला पाहायचे आहे, असे म्हणत होत्या. त्यानुसार दोघींना सर्वोच्च न्यायालयाचा काही भाग दाखवण्यात आला. तथापि, कडाक्याच्या थंडीमुळे काही वेळाने त्यांना परत पाठवण्यात आले. (Chief Justice DY Chandrachud)

अधिक वाचा :

Back to top button