

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पोलिस उपनिरीक्षक ते अप्पर पोलिस अधीक्षक दर्जाचे अधिकारी यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्याचा शासन निर्णय गृहविभागाने गुरुवारी (दि.5) काढला. यानुसार प्रतिवर्षी पोलिस अधिकार्यांना आता 6 हजार रुपये गणवेश अनुदान मिळणार आहे. पूर्वी चार वर्षांकरिता 5 हजार रुपये इतके अनुदान मिळत होते. (Police Uniform Allowance)
राष्ट्र निर्माण संघटनने 6 वर्षांपूर्वी पोलिस महासंचालक यांच्याकडे ही मागणी केली होती. गणवेश अनुदान वाढ झाल्याने संघटनच्या प्रयत्नांना यश आल्याची माहिती संघटन संचिव नीलेश नागोलकर यांनी शुक्रवारी दिली.(Police Uniform Allowance)
राज्यातील पोलिस दलात असलेले पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) ते अप्पर पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकारी यांना 5 हजार रुपये गणवेश अनुदान देण्यात येत होते. या गणवेश अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी सातत्याने होत होती. 4 वर्षांतून एकदा देण्यात येणारे गणवेश अनुदान हे 5 हजार रुपये होते. बाजारभावातील दरवाढीचा विचार करता हे अनुदान अत्यल्प होते. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक ते अप्पर पोलिस अधीक्षक दर्जाचे अधिकारी यांच्या गणवेश अनुदानात वाढ करण्याचा शासन निर्णय गृहविभागाने गुरुवारी काढला. आता प्रतिवर्षी 6 हजार रुपये या अधिकार्यांना अनुदान मिळणार आहे. हा शासन आदेश एक जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे. (Police Uniform Allowance)
याबाबत नीलेश नागोलकर म्हणाले, पोलिस अधिकारी यांना 4 वर्षांतून एकदाच 5 हजार रुपये मिळणारे गणवेश अनुदान फार अपुरे होते. यासाठी राष्ट्रनिर्माण संघटन 2013 पासून गणवेश अनुदानासाठी काम करत आहे. शासनाचा 2016 चा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे पत्रही आपल्याकडे होते. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात या विषयावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली होती. ती आज पूर्ण झाली.
अधिक वाचा :