धक्‍कादायक! औरंगाबादमध्ये एसीपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल | पुढारी

धक्‍कादायक! औरंगाबादमध्ये एसीपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शहर पोलीस दलात खळबळ उडवून देणारी घटना  मकर संक्रांतीच्या दिवशी समोर आली आहे. औरंगाबाद शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्‍त ( एसीपी) शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   विशाल ढुमे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. तो एसीपी असून गुन्हे शाखा व क्राईम ब्रांचची जबाबदारी आहे. एसीपीवर असलेला ढुमे अंदाजे दीड वर्षापासून औरंगाबादमध्ये कार्यरत आहे.

शनिवारी रात्री ढुमे एका हॉटेलमध्ये गेला होता. तिथे आधीपासून त्याचा मित्र पत्नीसह बसलेला होता. घरी जाताना ढुमे याने त्यांना लिफ्ट मागितली. कारमध्येच त्याने महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाथरूमला जायचे म्हणून त्यांच्या घरी गेला. तेथे त्याने महिलेचा विनयभंग केला. तिच्या पतीला मारहाण केली. रात्री दोन वाजता हा प्रकार घडला. यानंतर त्‍याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button