हिंदू तरुणींच्या धर्मांतरणावर टीका; पाकमध्ये युवकाला जेलमध्ये टाकले | पुढारी

हिंदू तरुणींच्या धर्मांतरणावर टीका; पाकमध्ये युवकाला जेलमध्ये टाकले

इस्लामाबाद; वृत्तसेवा : हिंदू मुलींचे अपहरण तसेच बळजबरीने त्यांचे धर्मांतर केले जात असल्याबद्दल; मौला, तू इतका क्रूर कसा होऊ शकतोस, असा टाहो सोशल मीडियावरून फोडल्याने पाकिस्तानातील सिंध प्रांतातील एका हिंदू युवकाला पाक पोलिसांनी जेलमध्ये टाकले आहे. बिटर विंटर या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, लवकुमार असे या हिंदू युवकाचे नाव आहे. लवकुमारवर ब्लास्फेमीचा (अल्लाह किंवा प्रेषित मोहम्मद यांच्यावर टीका करणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांनी लवकुमारच्या कुटुंबीयांना अटकेची माहिती दिली नव्हती. 22 नोव्हेंबर रोजी हा मुलगा बेपत्ता झाला होता. त्यानंतर 27 डिसेंबर रोजी कुटुंबीयांना तो तुरुंगात असल्याचे कळले. लवकुमारच्या कुटुंबीयांनी त्याच्या सुटकेसाठी गयावया केल्या; पण उपयोग झाला नाही.

लुबाडणुकीसाठीही वापर

  • पाकमधील पंजाब, सिंध आणि खैबर पख्तुनख्वा भागातील हिंदू, ख्रिश्चन समुदायांवर अल्ला व प्रेषित मोहम्मद यांच्यावर टीका केल्याचा आरोप करून अनेकदा हल्ले केले.
  • विशेषत: हिंदू समाजाच्या जमिनी बळकावण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी काही स्थानिक मुस्लिम हिंदूंवर हा आरोप करून आपले हित साधत असतात.

ब्लास्फेमी काय?

  • अल्लाह किंवा प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल बरेवाईट बोलणे, हा ब्लास्फेमी कायद्यांतर्गत गुन्हा.
  • या गुन्ह्याचेही नेमके वर्णन पाकिस्तानी राज्यघटनेत नाही. गुन्ह्यात फाशीची शिक्षा शक्य.
  • अनेकदा स्थानिक मुस्लिमच शिक्षा करतात. ब्लास्फेमीचा ठपका ठेवून 2022 मध्ये बौद्ध व्यक्तीला जिवंत जाळले होते.

अधिक वाचा :

Back to top button