पैठण; पुढारी वृत्तसेवा: पैठण तालुक्यातील ढोरकीन शिवारात खून झाल्याची खळबळजनक उघडकीस आली आहे. संदीप सूर्यभान साळवे (रा. आंबेडकरनगर, औरंगाबाद) असे ढोरकीन शिवारात खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढोरकीन शिवारातील राम परीकर यांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करणाऱ्या संदीप साळवे शुक्रवारी (दि.१०) रोजी रात्री तीन वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
संदीप साळवे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याने या घटनेची माहिती वस्तीवर संदीपसोबत राहणाऱ्या मित्राने एमआयडीसी पोलिस ठाण्याचे दिली. यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे याच्यांसह पोलीस पथक आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.
या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे व ग्रामीण गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने देखील पाहणी करून आरोपीच्या तपासाच्या संदर्भात पोलिस पथकाला सूचना दिल्या.
सदरील तरुणाचा खून कोणी व कशासाठी केला?. यासंदर्भात पोलीस शोध घेत आहेत. या दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी दोन संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचलंत का?