पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : अमेरिकेवरील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याने जगाला खूप काही शिकविले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या हल्ल्याच्या विसाव्या स्मृतीदिनी केले. गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदारधाम भवनचे उद् घाटन मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बालिका छात्रावासचेही भूमिपूजन केले.
अमेरिकेवर झालेल्या 9/11 च्या हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, त्या हल्ल्याने जगाला खूप काही शिकविले आहे. हा मानवतेवरील हल्ल्याचा दिवस आहे.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. अशावेळी सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास…हा मंत्र लक्षात ठेवून काम करण्याची गरज आहे.
कोणतेही काम करण्याआधी गणेशपूजा करण्याची आपली परंपरा आहे आणि सौभाग्याने सरदारधाम भवनचे उद्घाटन गणेशोत्सवातच होत आहे.
१८९३ साली आजच्याच दिवशी शिकागो येथे स्वामी विवेकानंद यांनी ऐतिहासिक भाषण दिले होते, असे मोदी यांनी सांगितले.
तामिळी कवी सुब्रमण्यम भारती यांचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, सुब्रमण्यम भारती यांनी आपले पूर्ण जीवन समाज आणि देशाच्या कल्याणासाठी घालविले.
देशाची तसेच मानवाची एकता यावर त्यांचा भर होता. त्यांचा हा आदर्श भारताच्या विचार आणि दर्शनाचा अविभाज्य भाग आहे.
बनारस हिंदू विश्वविद्यालयात सुब्रमण्य भारती यांच्या नावाने केंद्र उघडले जाईल, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमास गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल हेही उपस्थित होते.
हेही वाचलं का ?