सपना चौधरीचा कार अपघातात मृत्यू झाल्‍याची अफवा, नेटकर्‍यांनी वाहिली श्रध्दांजली (video)

sapna choudhary
sapna choudhary
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : हरियाणवी डान्सर सपना चौधरी सध्या चर्चेत आहे. सपना चौधरीचे हरियाणासह चित्रपट इंडस्ट्रीत नाव प्रसिध्द आहे. तिचे फॅन फॉलोईंग कुठल्याही मोठ्या सुपरस्टारच्या फॅन्सपेक्षा कमी नाही. नुकताच सपना चौधरीविषयी एक धक्कादायक वृत्त समोर आले.

एका कार अपघातात तिचा मृत्यू झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरले. या वृत्तानंतर नेटकरी तिला श्रद्धांजली वाहू लागले होते. परंतु, ती अफवा असल्याचे समजले आणि तिच्या फॅन्सनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

सपना चाैधरीचा अपघात झाला एक केवळ अफवा आहे. ती आपल्या कुटुंबीयांसोबत ठीक आहे. अशी माहिती समोर आली.

व्हिडिओ झाला व्हायरल

सपनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आलाय. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक लेटेस्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्‍ये ती आरशासमोर बसून स्वत: मोबाईलवर व्हिडिओ करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिचा मेकअप आर्टिस्ट तिची हेअरस्टाईल करताना दिसतोय.

या व्हिडिओमध्ये सपनाचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेत. व्हिडियोमध्ये ती 'मोटी मोटी अंख…मेरी करती शरारता …….' गाण्यावर एक्सप्रेशन देत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारों फॅन्सनी लाईक केलं आहे.

सपनाचा स्टेज शोज पाहण्यासाठी आजदेखील लाखो प्रेक्षकाची गर्दी होते. तिच्या झुमक्यांवरदेखील फॅन्स नेहमी फिदा रहअसतात. सपना न केवळ तिच्या डान्समुळे चर्चेत राहते. तर तिच्या सुंदर फोटोंमुळे तिची चर्चा होत राहते. ती सोशल मीडियावर देखील ॲक्टिव्ह असते.

ती सध्या अँड टीव्हीवरील एक क्राईम शो 'मौका-ए-वारदात' मध्ये दिसत आहे.

रवी किशन आणि मनोज तिवारी यांच्यासोबत ती शो होस्ट करत आहे.

याशिवाय ती भोजपुरी, पंजाबी, बॉलीवूड इंडस्ट्रीमध्येदेखील काम केलं आहे. तिने बॉलीवूडमध्ये 'दोस्ती के साईड इफेक्ट्स' चित्रपटातून डेब्यू केलं होतं. ती 'बिग बॉस-११'ची स्पर्धकदेखील होती.

हेही वाचलं का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news