ताडकळस (परभणी); प्रतिनिधी: ताडकळस येथे एका मुस्लिम तरुणाने मृत वानरावर अंत्यसंस्कार केले. ताडकळसच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे.
ताडकळस येथील तरुण फिरोज पठाण याला गावात एक वानर आजारी पडल्याची माहिती मिळाली. यानंतर वानराला वाचण्यासाठी त्याने तातडीने ताडकळस येथील पशु वैद्यकीय अधिकार्यांना बोलावले. परंतु, वानर खूपच आजारी असल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
फिरोज पठाण यांनी स्वत: पुढाकार घेऊन आपल्या मित्राच्या मदतीने अंत्यविधीची तयारी सुरू केली.फिरोज याने गावातील पोलीस काँलनीमधील मारोती मंदिराजवळ जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खणला. यानंतर त्याने मित्राच्या मदतीने त्या वानरावर हिंदू रितिरिवाजाप्रमाणे अत्यसंस्कार केले.
यावेळी मृत वानरासोबत आणखी एक लहान वानरांचे पिल्लू सोबत होते. त्याला फिरोजने झाडाच्या फांदीवर नेवून सोडले. परंतु, हे पिल्लू ज्या ठिकाणी मोठया वानरांवर अत्यसंस्कार केले होते तेथे सारखेसारखे येवून इतरत्र पाहात राहिले.
या घटनेमुळे माणुसकी जिवंत असल्याचे आणखी एक उदाहरण पाहायला मिळाले आहे. या घटनेनंतर फिरोज पठाण यांनी एक आदर्श निर्माण केला असल्याचे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
हेही वाचलंत का?