औरंगाबाद : गुरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू | पुढारी

औरंगाबाद : गुरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू

फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा : जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या एकाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.२३) दुपारी ४ वाजता फर्दापूर शिवारातील धुंदर तलावात घडली. आशिष संतोष जाधव (वय १७) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

फर्दापूर येथील आशिष संतोष जाधव जनावरांना चारण्यासाठी धुंदर शिवारातील पाझर तलाव परिसरात गेला होता. यावेळी जनावरांना ओढताना आशिष तलावाच्या पाण्यात पडला व बुडू लागला. ही घटना त्याच्या मित्रांनी बघितली व आशिषला वाचवण्यासाठी आरडा ओरडा केला. मात्र, मदत पोहचण्यापूर्वीच आशिषचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाझर तलावाकडे धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने आशिषचा मृतदेह तलावा बाहेर काढला. या घटनेची फर्दापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button