औरंगाबाद : 12 कोटींची फसवणूक, दोघांचा जामीन फेटाळला | पुढारी

औरंगाबाद : 12 कोटींची फसवणूक, दोघांचा जामीन फेटाळला

औरंगाबाद : अल्युमिनियम स्क्रॅप प्रकरणात 67 कोटींचे बनवाट बिल तयार करून त्याद्वारे बारा कोटी रुपयांच्या इनपूट टॅक्स क्रेडिट निर्माण करून शासनाची फसवणूक करण्यात आली होती. फसवणूक करणार्‍या दोघांचा नियमित जामीन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. माळी यांनी फेटाळून लावला. समीर रेणुकादास चौधरी आणि मनोज व्यास अशी आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या दोघा आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. दोघांनीही नियमित जामीनासाठी अर्ज केला होता. सरकारी वकील जरिना दुर्रानी यांनी काम पाहिले.

Back to top button