औरंगाबाद : पिस्‍तुलाचा धाक दाखवून भरदिवसा पेट्रोल पंपावर दरोडा  | पुढारी

औरंगाबाद : पिस्‍तुलाचा धाक दाखवून भरदिवसा पेट्रोल पंपावर दरोडा 

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : पिस्तुलचा धाक दाखवून दोघांनी  पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. लुटीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला आहे. भरदिवसा पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

दौलताबाद जवळील माळीवाडा (जि. औरंगाबाद) येथे पेट्रोल पंप कर्मचारी केबीनमध्ये पैसे मोजत बसले होते. यावेळी दाेघे जण तोंडाला बांधून येथे आले. यावेळी यातील एकाने खिशातून पिस्तुल काढत पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना पैसे देण्यास सांगितले.

यावेळी सोबतच्या दुसऱ्याने धारदार शस्‍त्र (गुप्ती) चा धाक दाखवत पिशवीत पैसे भरले. दोघांकडेही शस्त्रे असल्याने कर्मचारी काही करू शकले नाहीत.

या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस आयुक्तांनी  घटनास्थळी भेट दिली.  साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रेकी करून  त्यांनतर काही वेळाने येऊन दोघा चोरट्यांनी पिस्तुल आणि गुप्तीच्या धाकावर मोठी रक्कम लुटल्याचे समोर आले आहे.

हेही वाचलं का :

पहा व्‍हिडिओ : येत्या काळात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध – शीतलकुमार रवंदळे

Back to top button