जळगाव : रवींद्रभैय्या पाटील यांच्या राजीनाम्याने सहकार क्षेत्रात खळबळ | पुढारी

जळगाव : रवींद्रभैय्या पाटील यांच्या राजीनाम्याने सहकार क्षेत्रात खळबळ

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा :  रवींद्रभैय्या पाटील : जिल्हा बँकेला ईडीने नोटीस दिली आहे. दुसरीकडे बँकेची निवडणूक तोंडावर आली आहे. अस असतानाचं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा बँकेचे ज्येष्ठ संचालक रवींद्रभैय्या पाटील यांनी संचालकपदाचा राजीनामा दिल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

राजीनामा का दिला याबाबत तर्कवितर्क

जिल्हा बँकेत खूप घडामोडी घडल्या. ईडीने संत मुक्ताई साखर कारखान्यासाठी दिलेल्या कर्जाबाबत विचारणा करणारी नोटीस बजावली.

यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच रवींद्रभैय्या पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

ते बँकेचे ज्येष्ठ संचालक असून त्यांनी बँकेच्या चेअरमनपदाची धुरा देखील सांभाळलेली आहे. त्यांचे वडील भाऊसाहेब प्रल्हादराव पाटील हे देखील प्रदीर्घ काळ संचालक व नंतर चेअरमन होते.

अर्थात, जिल्हा बँकेच्या इतिहासातील काही दशके पाटील घराण्यातील संचालक कार्यरत आहेत.

राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण

रवींद्र पाटील यांनी त्यांच्या संस्थेला जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाबाबत वन टाईम सेटलमेंट होण्यातील अडचणींमुळे राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथराव खडसे यांच्यामुळे ही सेटलमेंट होऊ न शकल्याचा आरोप पाटील यांनी आधी देखील केला आहे.

यातच त्यांनी आता थेट राजीनाम्याचा निर्णय घेतल्याने जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यावर रवींद्र भौय्य पाटील यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, मी माझ्या वैयक्तिक कारणाने बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.

याच्याशी ईडी व कोणत्याच प्रकरणाचा संबंध नाही.

कारण कर्ज देताना एमडी हे कागदपत्रे पाहून कर्ज देत असतात व त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलाताना त्‍यांनी नाराजी वैगेरे काही नाही. मी नुकतेच सर्वपक्षीय पॅनलसाठी एकनाथ खडसे, अनिल भाईदास पाटील, गुलाबराव पाटील, इतर नेत्यांशी चर्चा सुरू असल्‍याच ते म्‍हणाले.

 

Citizenship Amendment Act
PM Narendra Modi
माेठी बातमी : 'सीएए' अंतर्गत १४ निर्वासितांना नागरिकत्व प्रमाणपत्र सुपूर्द
नकली राष्ट्रवादी, नकली शिवसेना कॉंग्रेसमध्ये विलीन होणार
previous arrow
next arrow

Back to top button