भाजप नगरसेवक खरात यांच्यासह ५ जण २ वर्षांसाठी हद्दपार | पुढारी

भाजप नगरसेवक खरात यांच्यासह ५ जण २ वर्षांसाठी हद्दपार

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा :  विविध गुन्ह्यांमधील सहभाग व दहशत निर्माण करणाऱ्या भुसावळ शहरातील खरात टोळीच्या ५ सदस्यांना २ वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्‍ये भाजप नगरसेवक राजकुमार रवींद्र खरात यांचा समावेश आहे.  हद्‍दपार केल्‍यांमध्‍ये भाजप नगरसेवक खरात यांचा समावेश असल्‍याने ही कारवाई राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला अआहे.

भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांची अमानुष हत्या करण्यात आली होती. ते, त्यांचा भाऊ आणि त्यांची मुले अशा एकूण पाच जणांना एकाच वेळी संपविण्यात आल्याने हे प्रकरण गाजले होते.

यानंतर त्यांच्या प्रभागातून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र राजकुमार रवींद्र खरात यांना सर्वांनी मिळून बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून दिले होते.

यानंतर खरात यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा अनेक गुन्ह्यात सहभाग आढळून आला.

त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून बऱ्याच जणांना धमकावण्यातही त्यांचा समावेश असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.

या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. त्याला मान्यता मिळाली आहे.

याच्या अंतर्गत टोळी प्रमुख आतिष रविंद्र खरात (वय-२५, रा. सामना नगर, भुसावळ) याच्यासह टोळी सदस्य राजकुमार उर्फ सनी रविंद्र खरात ( वय २७, २ समता नगर भुसावळ); हंसराज रविंद्र खरात, (रा. समता नगर); राजन उर्फ गोलू – रविंद्र खरात, (वय २२, रा. समता नगर भुसावळ) आणि अमोल उर्फ चिन्ना शाम खिल्लारे, (वय २५, रा. शमुखवाडी रेल्वे वॉटर टँक, हनुमान मंदिरा जवळ अकोला ह.म,समत भुसावळ ) या पाच जणांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी जारी केले आहेत.

याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी जारी केले आहेत.

हद्दपारीचा प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब ठोंबे, सपोनि संदीप दुनगहू, सहायक फौजदार अनिल चौधरी, हवालदार संदीप चव्हाण, पोना विनोद तडवी यांनी तयार केला होता. याला आज मान्यता मिळाल्याने खरात टोळी दोन वर्षांसाठी जिल्ह्याबाहेर राहणार आहे.

Back to top button