जेम्‍स बाँड : कादंबरीकार इयान फ्लेमिंग यांचा नायक ठरला ‘विक्रमवीर’ | पुढारी

जेम्‍स बाँड : कादंबरीकार इयान फ्लेमिंग यांचा नायक ठरला 'विक्रमवीर'

पुढारी ऑनलाईन डेस्क : या जगात जेम्स बाँड हे नाव माहीत नसणारा दुर्मिळच म्हणावा लागेल. हे भन्नाट पात्रं उभं करणारा आणि अख्ख्या जगाला खिळवून ठेवणारा कादंबरीकार होते इयान फ्लेमिंग ! आज त्‍यांचा स्‍मृति दिन. त्यानिमित्त  जेम्स बाँड नायकाची  निर्मिती आणि गेल्‍या अनेक पिढ्यांचे मनोरंजन करत आलेलं हे पात्र साकारणार्‍या इयान फ्लेमिंग यांच्‍याबद्दल जाणून घेऊ या…

बाँड हा एकमेव असा गुप्तहेर आहे, ज्याने कधीच आपली ओळख लपवली नाही. त्याला खलनायकांना मारण्याचं लायसेन्सच मिळालं आहे. त्याने संपूर्ण विश्‍वाला वेठीस धरणार्‍या खलनायकाचा खात्‍मा करणारा हा नायक. पडद्‍यावर त्‍याने आतापर्यंत ३६५ पेक्षा जास्त खलनायकांना यमसदनी पाठवलेलं आहे.

असा हा भन्नाट बाँड लोकापर्यंत पोहोचविणारा लेखक खरंच ग्रेट म्हणायला हवा…

जेम्स बाँडचे लेखक इयान लंकास्टप फ्लेमिंग हे एक पत्रकार, लेखक आणि नौदलाच्‍या गुप्तचर विभागातील अधिकार होते. मूळचे श्रीमंत घरात जन्माला आलेले इयान फ्लेमिंगो यांचे वडील हेनले यांनी इयान यांच्‍या शिक्षणाला प्राधान्‍य देण्‍यास सांगितले.त्यामुळे फ्लेमिंगो मोठमोठ्या शिक्षण संस्थांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये त्‍यांचे शिक्षण घेतले.

फ्लेमिंग यांनी १९५२ मध्ये पहिल्यांदा ‘कॅसिनो रॉयोले’ नावाची कादंबरी लिहिली

अख्ख्या जगाला खिळवून ठेवणारा कादंबरीकार

फ्लेमिंग यांनी १९५२ मध्ये पहिल्यांदा ‘कॅसिनो रॉयोले’ नावाची कादंबरी लिहिली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

१९५३ ते १९६६ या वर्षांमध्ये बाँड संदर्भात कादंबऱ्या आणि लघुकथांचे दोन संग्रह लिहिले. त्‍याच्‍या भोवतीच या कादंबऱ्याचे लेखन फिरते. गुप्तहेर खात्यातील एक अधिकारी म्हणून  बाँड हा ओळखला जातो.

जेम्स बाँडला 007 या नावाने ओळखले जाऊ लागले

जेम्स बाँडला पहिल्यांदा MI-6 आणि नंतर 007 या नावाने ओळखले जाऊ लागले. या कादंबरीच्या १०० कोटी प्रतिंची विक्री झाली आहे. त्यामुळे जगात पुस्तक विक्रीमध्ये रेकॉर्ड केला आहे.

२००८ मध्ये द् टाईम्सने केलेल्या सर्वेक्षणात १९४५ नंतर ५० महान ब्रिटीश लेखकांच्या यादीत इयान फ्लेमिंग यांचे १४ वे स्थान होते.

असं सांगितलं जातं की, फ्लेमिंग हे गुप्तहेर खात्यात काम करत असल्यामुळे त्यांच्या गुप्त माहिती मोठ्या प्रमाणात होती. ती माहिती जेम्स बाँडच्या पुस्तकाच्या स्वरूपात पुढे आली. या पुस्तकावर साहित्यविश्वात काही समिक्षकांनी मोठ्या प्रमाणात टीकाही केली होती.

प्‍लेमिंग यांचा नायक रोमॉटिंग आहे मात्र तो कधीच नायिकेचा प्रेमात पडत नाही. संपूर्ण जगाची सुरक्षाच वेठीस धरणार्‍या खलनायकाचा खात्‍मा करणे हे त्‍याचे लक्ष्‍य असते.

प्रत्‍येकवेळी तो नवीन मोहिम पार पडतो. फ्लेमिंग यांनी मांडलेला बाँड हा हाणामारी करत नाही तर तो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर खलनायकाचा बिमोड करतो.

हीच बाँडच्‍या यशाची काहणी आहे. तो संपूर्ण मानवजातीला संकटातून तारणारा नायक आहे.

गेली सात दशक प्रत्‍येक पिढीलाही बाँड हा आपल्‍याच पिढीचा नायक वाटतो, हेच प्‍लेमिंग याच्‍या लेखनीचे यश आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ :पुण्याच्या निकीताने केला भरतनाट्यममध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

 

Back to top button