खरीप नुकसानीची उर्वरित रक्कम द्या : आ. आशुतोष काळे | पुढारी

खरीप नुकसानीची उर्वरित रक्कम द्या : आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पावसाचा दीर्घकाळ खंड पडल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले. दुष्काळाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आगावू 25 टक्के पीक विमा नुकसान भरपाई आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून मिळाली, मात्र उर्वरित 75 टक्के भरपाईसह बाजरी, कापूस, भुईमुग, तूर आदी पिकांचे अद्याप 25 टक्के भरपाई मिळाली नाही. वंचितांना भरपाई मिळावी, यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार, पालकमंत्री विखे, कृषी मंत्री मुंडे व मदत पुनर्वसन मंत्र्यांकडे मागणी करणार आहे, असे आ. काळे म्हणाले. चालू खरिपात शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न होईल, अशी अपेक्षा होती, परंतु अवर्षणग्रस्त कोपरगाव मतदारसंघाकडे वरुणराजाने पाठ फिरवली.

खरिपात महिन्याहून अधिक काळ पावसाने खंड पाडला. खरीप सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, भुईमूग, तूर ही उभी पिके जळाली. शेतकर्‍यांचे स्वप्न धुळीस मिळाले. आर्थिक अडचणी वाढल्या. नुकसानीची दखल घेत आ. काळे यांनी मतदारसंघात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानीची पाहणी करावी, शेतकर्‍यांना लवकर विमा कंपनीने भरपाई द्यावी, 25 टक्के आगाऊ पीक विमा भरपाई मिळावी, यासाठी सतत पाठपुरावा केला. सोयाबीन व मका नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना 25 टक्के भरपाई 34.18 कोटी रुपये भरपाई मिळाली, परंतु सोयाबीन, मक्याची भरपाई मिळाली नाही. बाजरी, कापूस, भुईमुग, तूर नुकसानग्रस्त शेतकरी 25 टक्के भरपाईपासून वंचित आहेत. या शेतकर्‍यांना 25 टक्के व उर्वरित 75 टक्के भरपाई लवकर मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असे आ. काळे म्हणाले.

Back to top button