Nagar : पाथर्डीतून सोन्याचे व्यापारी बेपत्ता | पुढारी

Nagar : पाथर्डीतून सोन्याचे व्यापारी बेपत्ता

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  मुंबईवरून पाथर्डीला आलेले सोन्याचे व्यापारी दिपेशकुमार अशोक जैन बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी त्यांचे चुलत बंधूतनसुख केवलचंद जैन यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिपेशकुमार जैन हे सुमारे वीस वर्षांपासून पाथर्डी येथे येऊन सोन्याचा व्यापार करतात. दिपेशकुमार जैन हे मुंबईवरून 5 फेब्रुवारीला सायंकाळी पाथर्डीत आले होते. ते येथीलतील एका लॉजमध्ये राहत होते. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळनंतर दिपेशकुमार यांचा फोन चालू होता. मात्र, कोणत्याही नातेवाईकांचा फोन त्यांनी उचलला नाही.

त्यानंतर नातेवाईकांनी पाथर्डीत त्यांच्याशी संबंधित असणार्‍या लोकांशी संपर्क साधला. मात्र, त्यांचा कोणताच ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर दिपेशकुमार यांच्या नातेवाईकांनी थेट पाथर्डी गाठली. त्यांनी लॉजवर जाऊन दुसर्‍या चावीने रूम उघडून पाहिली. तेथे दिपेशकुमार यांची बॅग व मोबाईल मिळून आला. त्यानंतर दिपेशकुमार यांचा पाथर्डी शहरात शोध घेतला असता, ते आढळून आले नाहीत.

Back to top button