कर्जत : लोखंडी प्लेटा चोरणारा जेरबंद | पुढारी

कर्जत : लोखंडी प्लेटा चोरणारा जेरबंद

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर-सोलापूर महामार्गावर पुलाच्या कामावरून 5 लाख 41 हजार रुपये किमतीच्या लोखंडी प्लेटा व साहित्य चोरणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर माही जळगाव बायपास पुलाची व थेरगाव फाटा पुलाच्या कामावरून 19 जुलै रोजी मध्यरात्री एक ते पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान 5 लाख 41 हजार 928 लोखंडी प्लेटा चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मनीष भगवान पाटील (रा.जामनेर, जि.जळगाव) यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही चोरी ऋषिकेश शिवाजी शिंदे (रा.रातंजन रोड, मिरजगाव) याने केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली. यानंतर त्यांनी अवघ्या काही तासातच ऋषिकेश शिंदे याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्यासमवेत दोन अल्पवयीन इतर साथीदार असल्याची देखील त्यांनी सांगितले. या चोरीतील मुद्देमालासह टेम्पो पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय कासार, हवालदार सुनील माळशखरे, बबन दहिफळे, विकास चंदन, सुभाष पंडागळे, सुरेश खैरे यांनी केली.

हेही वाचा

अहमदनगर : सैनिकांचे प्रश्न सोडविण्यास प्रशासन तत्पर : अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी

ठाणे : बारवी धरणाची पाणीपातळी ७०.६४ फुटांवर; सतर्कतेचा इशारा

अहमदनगर : शिवसेनेकडून आयुक्तांना कंदिल भेट; बंद पथदिव्यांच्या निषेध

Back to top button