अहमदनगर : शिवसेनेकडून आयुक्तांना कंदिल भेट; बंद पथदिव्यांच्या निषेध | पुढारी

अहमदनगर : शिवसेनेकडून आयुक्तांना कंदिल भेट; बंद पथदिव्यांच्या निषेध

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : सावेडी, प्रोफेसर कॉलनी चौकातील बंद पडलेले पथदिवे तात्काळ सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने मनपा आयुक्तांना कंदील भेट देण्यात आला. याप्रसंगी युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माजी महापौर अभिषेक कळमकर (शरद पवार गट), नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरिष ज़ाधव, नगरसेवक योगीराज गाडे, दत्ता जाधव, अमोल येवले, परेश लोखंडे, अशोक दहिफळे, मुन्ना भिंगारदिवे, संतोष पाटील, अरुण झेंडे, महेश शेळके, उमेश भांबरकर, संतोष डमाळे, पप्पू ठुबे, गुडू भालेराव, विशाल गायकवाड, जेम्स आल्हाट, जालिंदर वाघ, गिरीधर हांडे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले, नगर शहरातील सावेडी भागातील प्रोफेसर कॉलनी चौकापासून पुढे हडकोकडे जाणारे पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. या मागचे गौडबंगाल काय आहे हे काही केल्या समजत नाही. या रस्त्याचे आणि पथदिव्याचे काम पूर्ण होऊन काही महिने उलटून गेली आहेत.

परंतु, या ठिकाणी पथदिवे जाणून बुजून बंद ठेवण्यात आले आहेत. आकाशवाणी, तहसील कार्यालय, मनपा प्रभाग कार्यालय, आरोग्य केंद्र, तोफखाना पोलिस ठाणे या रस्त्यावर आहे. प्रोफेसर कॉलनी चौकात रात्रीच्या वेळी चौपाटी सारखे वातावरण असते. पण, येथील पथदिवे बंद असल्याने छोटे मोठे अपघात घडतात. पथदिवे तत्काळ सुरू होऊ शकतात. परंतु, लोकप्रतिनिधीचे संबंधित ठेकेदारांशी वाद झाल्याने पथदिवे बंद पडले आहेत.

विक्रम राठोड म्हणाले, शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत, त्यात स्ट्रीट लाईटही बंद असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मनपाचा या ठेकेदारावर वचक राहिलेला नाही. त्यामुळे मनपा व नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होत होत आहे. पालिकेच्या कारभारात सुरू असलेला दिव्याखालचा अंधार दूर करावा अन्यथा शिवसेना स्टाईलने शिवसैनिक रस्त्यावर उतरेल, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या आंदोलनानंतर प्रशासन काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

अहमदनगर : काँग्रेसने ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवले

अहमदनगर : सैनिकांचे प्रश्न सोडविण्यास प्रशासन तत्पर : अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कुपलेवाडी, पखालेवाडीतील ९२ कुटुंबांचे स्थलांतर

Back to top button