नेवाशातील गाळ्यांच्या लिलावाला खंडपीठाची स्थगिती | पुढारी

नेवाशातील गाळ्यांच्या लिलावाला खंडपीठाची स्थगिती

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : शहरातील बाजारतळावरील झालेल्या गाळ्यांच्या लिलावाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वकिलाकडून देण्यात आली. शहरातील बाजारतळावर नगरपंचायतीने 44 व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम केले आहे. या गाळ्यांचा लिलाव नुकताच बंद पाकिटातून निविदा घेऊन करण्यात आला आहे. या लिलावामध्ये सदरचे काही गाळे 20 ते 25 लाखांच्या आसपास गेले आहेत. ज्यांनी बंद पाकिटातून निविदा भरली, त्यांनाच हे गाळे मिळाले आहेत.

दरम्यान, या गाळ्यांसमोर असलेल्या दुकानदारांनी आम्हाला अगोदर प्राधान्य द्यावे, यासाठी औरंगाबाद संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर खंडपीठात सुनावणी होऊन न्यायालयाने 7 जुलै रोजी केलेल्या लिलावाच्या अनुषंगाने पुढील प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले आहेत, असे वकिलाकडून सांगण्यात आले. या दुकानदारांच्या वतीने अ‍ॅड. संकेत सूर्यवंशी, नगरपंचायतीच्या वतीने अ‍ॅड. बटुळे, तर सरकारच्या वतीने अ‍ॅड. डी. एम. काळे यांनी काम पाहिले.

कही खुशी कही गम
नेवासा बाजारतळावर बांधलेल्या व्यापारी संकुलामधील गाळ्यांच्या लिलावाला न्यायालयाने स्थगिती दिल्याची माहिती वकिलाकडून मिळाल्याने, कही खुशी, कही गम असे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button