नगर : सीना नदी डिजिटल मॅपिंगचे काम पूर्ण | पुढारी

नगर : सीना नदी डिजिटल मॅपिंगचे काम पूर्ण

नगर : पुढारी वृत्तसेवा :  सीना नदीची हद्दनिश्चितीसाठी गेल्या काही दिवसांपासून महापालिका अतिक्रमण विभाग, कुकडी पाटबंधारे विभाग व भूमी अभिलेख विभाग मोजणी करीत होते. आज अखेर डिजिटल मॅपिंगचे(पाईंट) पूर्ण झाल्याची माहिती भूमिअभिलेखच्या अधिकार्‍यांनी दिली. सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते. याबाबत सर्वोच्च न्यायलायात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने सीना नदीची हद्द निश्चित करण्यासंदर्भात संबंधित विभागाला नोटिसा काढल्या होत्या.

त्यानुसार महापालिकेने कुकडी पाटबंधारे विभागाला बरोबर घेत सीना नदीची हद्द निश्चितीची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, हद्द निश्चित करणे ही बाब भूमिअभिलेख विभागाच्या आखत्यारित येत असल्याने भूमिअभिलेख विभागाला कळविण्यात आले. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून सीना नदी डिजिटल मॅपिंगचे काम सुरू होते. त्यातून नदीच्या हद्दीचे नकाशावरील पॉईंट फिक्स होणार आहेत. त्यासाठी भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक अविनाश मिसाळ, भूकरमापक ज्योती तिवारी, प्रवीण मिसाळ, अतिक्रमण विभागाचे अभियंता आदित्य बल्लाळ, क्षत्रिय अधिकारी रिजवान शेख, अर्जुन जाधव परिश्रम घेत होते. आज अखेर

सीना नदी मॅपिंगचे काम पूर्ण झाले आहे. सीना नदीची हद्दनिश्चितीसाठी गेल्या काही दिवसांपासून महापालिका अतिक्रमण विभाग, कुकडी पाटबंधारे विभाग व भूमी अभिलेख विभाग मोजणी करीत होते.

Back to top button