कुकाणा  : शेतकर्‍यांना कांदा अनुदान द्या; आ. गडाख यांचा अधिकार्‍यांना इशारा | पुढारी

कुकाणा  : शेतकर्‍यांना कांदा अनुदान द्या; आ. गडाख यांचा अधिकार्‍यांना इशारा

कुकाणा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : बाजार समितीत विक्री झालेल्या कांद्याला जाचक अटी घालून प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केले. परंतु आजपर्यंत शेतकर्‍यांना एक रुपयाही अनुदान देण्यात आले नाही. अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत सापडला असून, त्यांना तत्काळ अनुदान द्यावे. शेतकर्‍यांवर अन्याय केल्यास अधिकार्‍यांना रस्त्यावर फिरणे अवघड होईल, असा आमदार शंकरराव गडाख यांनी दिला. तालुक्यातील माका येथेे पाच कोटींच्या विकासकामाचा प्रारंभ आमदार गडाख यांच्या हस्ते झाला.

यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सरकारने विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल 350 रूपये अनुदानाची केवळ घोषणा केली. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. शेतकर्‍यांना त्वरित अनुदान द्यावे. संपूर्ण तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. जानेवारी महिन्यापर्यंत अनेक गावातील शेतात पाणीच पाणी होते. तरीही सापत्न वागणूक देऊन पाच मंडले अतिवृष्टीमधून वगळण्यात आली. या पाचही मंडलाना अतिवृष्टी अनुदान देऊन शेतकर्‍यांना शासनाने आधार द्यावा, अशी मागणी गडाख यांनी केली.

गडाख पॅटर्नची तालुक्यात चर्चा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार शंकरराव गडाख यांनी तालुक्यातील सहा गावांत दोन्ही गटांतील वाद मिटवून, गावाच्या विकासासाठी सर्वांना एकत्र आणले, त्यांच्या या पॅटर्नची तालुक्यात चर्चा होत आहे.

Back to top button