संगमनेर : प्रशिक्षणासाठी श्रद्धा गुंजाळ पोलंडमध्ये | पुढारी

संगमनेर : प्रशिक्षणासाठी श्रद्धा गुंजाळ पोलंडमध्ये

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील श्रद्धा भगवान गुंजाळ या विद्यार्थिनीची पोलंड येथील युरोपियन स्पेस एजन्सीमध्ये एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. जगभरातून निवड झालेल्या सहा विद्यार्थ्यांमध्ये श्रद्धा गुंजाळ ही भारताचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.

इंटरनॅशनल एअर अ‍ॅण्ड स्पेस प्रोग्रामसाठी केनडी स्पेस सेंटर येथे निवड झालेल्या जगातील 60 जणांपैकी श्रद्धा ही एकमेव भारतीय विद्यार्थीनी ठरली आहे. इटली, स्वीझरलँड, जर्मनी, युएसए, रशिया व भारत या सहा देशांचा समावेश असून सर्वात कमी वयाची ऑनलाईन ऍस्ट्रोनोट म्हणून श्रध्दा गुंजाळ ही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

पुण्याच्या एमआयटी महाविद्यालयात एरोनॉटिक्स इंजिनीअरींग या चार वर्षांच्या पदवी शिक्षणामध्ये तीने प्रवेश घेतला आहे. शिक्षण सुरू असता नाच इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रोईड सर्च कॅम्पमध्ये सहभाग घेऊन पृथ्वीच्या दिशेने येणार घातक अ‍ॅस्ट्रोईड तिने शोधला. या संशोधनाबद्दल इंडीया बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली. तसेच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वल्ड ऑफ रेकॉर्डचा सन्मानही तिला मिळालेला आहे.

मंत्री विखे व एकविरा फाउंडेशनची मदत
पोलंड येथे जाण्यापूर्वी श्रद्धाने मुख्य मंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. तिच्या प्रशिक्षणासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीन लाख रुपयांची मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच श्रध्दा हिला पोलांड येथे जाण्यासाठी एकवीरा फाउंडेशनच्यावतीने विमान प्रवासासाठी एक लाखांची मदत दिली असल्याची माहिती अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात यांनी दिली.

Back to top button