नगरमध्ये जय श्रीराम… जय हनुमान…चा जयघोष ! शहरात भक्तीपूर्ण वातावरणात हनुमान जयंती साजरी | पुढारी

नगरमध्ये जय श्रीराम... जय हनुमान...चा जयघोष ! शहरात भक्तीपूर्ण वातावरणात हनुमान जयंती साजरी

नगर : पुढारी वृत्तसेवा : जय श्रीराम… जय हनुमान… अशा जयघोषाने शहरात भक्तिमय वातावरण झाले होते. भक्तीपूर्ण वातावरणात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक मंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांनी दर्शनसाठी रांगा लावल्या होत्या. सूर्यदया वेळी उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.
शहरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सर्जेपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आज सकाळी हनुमान जयंती भक्तिभावाने साजरी झाली. यानिमित्त पहाटे हनुमानाच्या मूर्तीला महाभिषेक, हनुमान चालीसा पाठ, रामनामाचा जप व आरती करून विधिवत पूजा करण्यात आली, अशी माहिती प्रवीण परदेशी यांनी दिली.

शिवराजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे सर्जेपुरा गोकुळवाडी येथील दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी शिवराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन बाबनी, उपाध्यक्ष योगेश भंडारी, सचिव संजय साळी, खजिनदार मयुर बाबनी, संघटक गणेश कासार, अक्षय बाबनी, प्रेम वाकोडे, आकाश उघडे, सुरेंद्र बाबनी, जय इंगळे, शुभम प्रभळकर, मोहित बाबनी, गोरख साळी, निलेश भंडारी, चेतन भंडारी, अजय केंजरला, करण निस्ताने, महेश चुन्नाडी, अनिकेत भंडारी, मनोज बाबनी, सोपान मामा भंडारी, हृतिक भंडारी, सूरज भोरे, अक्षय केंजरला, ओंकार भंडारी आदी उपस्थित होते. झेंडीगेट दक्षिण मुखी हनुमान मंदिरात सालाबाद प्रमाणे विविध कार्यक्रमाने जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पहाटे तीर्थक्षेत्रातून कावडीने आणलेल्या पवित्र गंगा जलाने हनुमानाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला.

राहुल व कृपाल कावट यांच्या हस्ते दैवताची आरती करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, नगरसेवक नज्जू पहिलवान, देवस्थान प्रमुख रामदास कावट, पापालाल लढ्ढा, साईनाथ कावट, किसनदेवा कावट, विजय इथापे, कैलास मोकाटे, हेडा, झंवर, राजू आखमोडे आदी उपस्थित होते. जंगूभाई तालमीच्या सिद्धेश्वर तरुण मंडळ वतीने तोफखाना येथील संबोधी विद्यालय समोरील पुरातन हनुमान मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. हनुमान जयंतीनिमित्त पहाटे हनुमान मंदिरांत महाआरती, लघुरुद्राभिषेक, पूजा मंडळाचे अध्यक्ष राजूमामा जाधव यांच्या हस्ते करण्यात आली.

शक्ती, भक्तीचा मिलाप बजरंगबली : कवडे
शक्ती आणि भक्तीच मिलाप म्हणजे बजरंगबली होय. प्रभू रामचंद्रांची नि:स्सीम भक्ती करुन निष्ठा कशी असावी भगवंत हनुमानांनी आपल्या सेवेतून दाखवून दिले आहे. हा आदर्श आपल्या जीवनात अंगीकृत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांनी केले.हनुमान जयंतीनिमित्त नाना पाटील वस्ताद तालिमच्यावतीने मनपा स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. याप्रसंगी माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, नगरसेवक सचिन शिंदे, श्याम नळकांडे, दत्ता कावरे, संतोष गेनप्पा, सुरेश तिवारी, संजय सागावकर, मळू वामन, बजरंग शेळके आदी उपस्थित होते.

Back to top button