कोळपेवाडी : अनुदान योजनेतून 4.65 कोटींची मान्यता : आ. आशुतोष काळे | पुढारी

कोळपेवाडी : अनुदान योजनेतून 4.65 कोटींची मान्यता : आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी; पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव शहराला चेष्टेने धूळगाव असे संबोधले जायचे. ही ओळख पुसण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नातून कोपरगाव शहराच्या बहुतांशी मुख्य रस्त्यांचा प्रश्न मागील साडेतीन वर्षात सोडविला असून कोपरगावची ‘धूळगाव’ ओळख पुसण्यात यश मिळाले असून शहराच्या विविध रस्त्यांना पुन्हा एकदा 4.65 कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ.काळे यांनी शेकडो कोटीचा निधी देऊन शहरातील रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या अनेक मुख्य रस्त्यांना देखील निधी देऊन नागरिकांना रस्त्याच्या येणार्‍या अडचणी दूर केल्या आहेत. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 131.24 कोटी व कोपरगाव शहरातील रस्ते, शहर सुशोभीकरण, स्मशानभूमी विकास, शासकीय इमारती यासाठी आजपर्यंत 12 कोटींपेक्षा जास्त निधी दिला आहे.

कोपरगाव शहराच्या मुख्य रस्त्यांबरोबरच या रस्त्यांना जोडणार्‍या अनेक रस्त्यांची देखील मोठी दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना घरापासून मुख्य रस्ता गाठणे त्रासदायक ठरत होते. त्यामुळे मुख्य रस्त्यांना जोडणार्‍या रस्त्यांचा देखील विकास होणे गरजेचे होते व नागरिकांनी देखील आ. काळे यांच्याकडे या रस्ते दुरुस्तीचे गार्‍हाणे मांडले होते. त्याची दखल घेवून त्यांनी विशेष रस्ता अनुदान योजनेतून कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील या रस्त्याच्या कामांना 4.65 कोटींची प्रशासकीय मान्यता मिळविली आहे. नागरिकांनी आ. काळ

शहरातील या रस्त्यांची होणार कामे
प्रभाग 1, 4, 1, 3, 4, 6, 8, 9, 11, 12 14 या मधील रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण आदी कामे होणार आहेत. या रस्त्यांच्या कामाच्या निधीला तांत्रिक मान्यता मिळाली असून लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल व या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ होऊन नागरिकांची अडचण दूर होणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

Back to top button