शेवगाव तालुक्यात 79 गावांची अंतिम पैसेवारी 60 पेक्षा अधिक | पुढारी

शेवगाव तालुक्यात 79 गावांची अंतिम पैसेवारी 60 पेक्षा अधिक

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील 79 गावांची रब्बी पीक अंतिम पैसेवारी 60 पेक्षा जास्त लावण्यात आली असून, प्रशासनाने शेतकर्‍यांवर अन्याय केल्याची भावना तालुक्यात पसरली आहे. तालुक्यातील रब्बी पिकांची नजर व सुधारित पैसेवारी 70 पैसे जाहीर झाली होती. त्यानंतर हवामानात बदल झाला, तर आठ दिवसांपूर्वी वादळासह मध्यम पाऊस झाल्याने ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, उन्हाळी बाजरी, चारा पिकांचे नुकसान झाले.

उभा असणारा व मळणीच्या गव्हाचा रंग गेल्याने बाजारभाव मातीमोल झाले. असे असताना प्रशासनाने शेवगाव, एरंडगाव, बोधेगाव, चापडगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव मंडलांतील 64 ग्रामपंचायतीच्या 79 महसूल रब्बी गावांची सन 2022-23 ची रब्बी पीक अंतिम पैसेवारी 60 च्या पुढे जाहीर केली आहे.  या अगोदर खरीप 34 गावांची अंतिम पैसेवारी 50 च्या आत जाहीर झाल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, रब्बीची जाहीर केलेली अंतिम पैसेवारी चुकीची असल्याचा आरोप होत आहे.

जाहीर झालेली पैसेवारी ः-
नांदूर विहिरे (62 पैसे), निंबेनांदूर (63), बर्‍हाणपूर (64), आव्हाणे खुर्द, शहापूर, आव्हाणे बुद्रुक (65), बालमटाकळी, चापडगाव, ठाकूर पिंपळगाव (66), कुरुडगाव, रावतळे, कांबी, हातगाव, पिंगेवाडी, प्रभूवडगाव, खामपिंप्री, लखमापुरी, सोनविहीर, कांबी, वडुले बद्रुक, वडुले खुर्द, (67), तळणी, गदेवाडी, दहिगाव-शे, विजयपूर, गा. जळगाव, खडके, मडके, देवटाकळी, भायगाव, बक्तरपूर, मजलेशहर, ढोरसडे, अंत्रे, सुलतानपूर बुद्रुक, घेवरी, देवळाणे, जोहरापूर, खामगाव, हिंगनगाव-ने, ढोरजळगाव-शे, मलकापूर, गरडवाडी, आपेगाव, आखतवाडे, मळेगाव-ने, लोळेगाव, वाघोली (68), खुंटेफळ, दादेगाव, घोटण, अंतरवाली खुर्द ने, भातकुडगाव, शहरटाकळी, भावी निमगाव, दहिगाव-ने, रांजणी, ढोरजळगाव-ने, सामनगाव (69), एरंडगाव, लाखेफळ, ताजनापूर, बोडखे, खानापूर, कर्‍हेटाकळी (70), शेवगाव, खरडगाव, मुर्शतपूर, दहिफळ, ढोरहिंगणी, कर्जत खु (71), अमरापूर, आखेगाव ति. डो. आखेगाव, भगूर (72), सुलतानपूर खुर्द, शहजापूर, वरुर बुद्रुक, वरुर खुर्द (73).

Back to top button