नगर : चुकीच्या मार्गाने आलेले सरकार जाणार ! : आमदार प्राजक्त तनपुरे | पुढारी

नगर : चुकीच्या मार्गाने आलेले सरकार जाणार ! : आमदार प्राजक्त तनपुरे

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात चुकीच्या मार्गाने आलेले सरकार लवकरच जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जनतेच्या न्यायालयामध्ये महाविकास आघाडीचेच सरकार आहे. जलजीवन मिशन योजनेच्या कामांसाठी नारळ फोडण्याची स्पर्धा सुरू असल्याची टीका आमदार प्राजक तनपुरेंनी केली. त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. तालुक्यातील बहिरवाडीत विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रघुनाथ झिने, माजी सरपंच विलास काळे, रोहिदास कर्डिले, पोखर्डी सरपंच रामेश्वर निमसे, इमामपूर सरपंच भीमराज मोकाटे, किशोर शिकारे आदी उपस्थितीत होते.

विळद जलशुद्धीकरण केंद्रापासून बुर्‍हानगर योजनेतील वंचित गावांसाठी स्वतंत्र पाईपलाईन, जेऊर येथील सब स्टेशनचा ओव्हरलोड कमी करण्यासाठी पिंपळगाव माळवी येथे सबस्टेशन, तसेच मतदार संघात चार नव्याने सब स्टेशन मंजूर केले. विद्यमान मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे पाठपुरावा करून पाझर तलाव दुरुस्तीसाठी मोठा निधी मिळविला. कामांचे उद्घाटन, नारळ फोडणे निमित्त आहे. त्यामुळे शेतकरी, अधिकार्‍यांमध्ये चर्चा होते. बहिरवाडी येथे एक कोटी 62 लक्षांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बहिरवाडी येथील अंतर्गत वितरण व्यवस्था, मृद व जलसंधारण विभागांतर्गत काळे वस्ती आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी दत्तात्रय काळे, तुकाराम दारकुंडे, विष्णू जरे, बंडू काळे, दिगंबर जरे, अरुण काळे, हेमंत काळे, ग्रामपंचायत सदस्या सुनीता जरे, राजू पाटोळे उपस्थित होते.

, ‘समोरासमोर येऊन चर्चा करावी’
कामांचे उद्घाटन करणार्‍यांनी समोरासमोर येऊन चर्चा करावी. जनतेच्या दरबारात कोणी कोणते काम केले हे मी जाहीर सांगतो. त्यांनीही समोर यावे, असे आवाहन आमदार तनपुरेंनी विरोधकांना केले. आठ महिन्यांत खोक्याच्या सरकारला मंत्रिमंडळ बनवता आले नाही. रकारच्या प्रचंड दबावाखाली, सर्वच खात्याचे अधिकारी दिसून येत आहेत.

तलावातील पाण्यासाठी लिफ्टचा प्रयोग
बहिरवाडी तलावातून ओव्हर फ्लो होणारे पाणी परत बंधार्‍यातून तलावामध्ये टाकण्याची कल्पना माजी सरपंच विलास काळेंनी मांडली. त्यास आमदार तनपुरेंनी तत्काळ मंजुरी देत निधी देण्याचे जाहीर करून प्रायोगिक तत्त्वावर एका तलावात हा उपक्रम राबवू. त्यानंतर बाकीचे नियोजन करू, असे आमदार तनपुरेंनी सांगितले.

Back to top button