सोनई : हॉलतिकिट एकाचं अन् परीक्षार्थी भलताच! बारावी परीक्षेला डमी विद्यार्थी | पुढारी

सोनई : हॉलतिकिट एकाचं अन् परीक्षार्थी भलताच! बारावी परीक्षेला डमी विद्यार्थी

सोनई; पुढारी वृत्तसेवा : हॉलतिकिट एकाचं अन् परीक्षा भलताच देत असल्याचा प्रकार भरारी पथकाच्या निदर्शनास आला. सोनई येथे बारावी परीक्षेदरम्यान आढळलेल्या विद्यार्थ्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र संचालक गोरख मुरलीधर दहातोंडे यांनी फिर्याद दिली आहे.

23 फेब्रुवारीला बारावी परीक्षेत रवींद्र अण्णासाहेब बेल्हेकर (रा. श्रीरामवाडी) या विद्यार्थ्याच्या हॉल तिकिटवर अक्षय गणेश वाघ (रा. बेल्हेकरवाडी) हा परीक्षा देताना पथकाच्या निदर्शनास आले. संगनमताने तोतयागिरी करून मीच परीक्षार्थी विद्यार्थी असल्याचे भासवित डमी विद्यार्थी बसला. बारावी बोर्डाचा विश्वासघात करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सोनई पोलीस ठाण्यात कलम 419,34 महाराष्ट्र परीक्षा 31/1982 कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button