वाळकी : चोरीला गेलेले सोन्याचे गंठण परत | पुढारी

वाळकी : चोरीला गेलेले सोन्याचे गंठण परत

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील भोयरे पठार येथून घरफोडी करून चोरीस गेलेले सुमारे दीड लाख रुपये किमतीचे 3 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण नगर तालुका पोलिसांनी तत्परतेने तपास करीत चोरट्यांकडून हस्तगत करून फिर्यादीस परत मिळवून दिले.
दि.16 फेब्रुवारी 2021 रोजी अविनाश बाबासाहेब साठे (रा. भोयरेपठार, ता नगर) त्यांच्या कुटुंबीयांसह घरास कुलूप लावून समारंभास गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून 3 तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरून नेले, याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्यातील आरोपींना नगर तालुक्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. दीड लाखांचे 3 तोळ्याचे सोन्याचे गंठण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून बुधवारी (दि.22) दुपारी फिर्यादी अविनाश बाबासाहेब साठे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

Back to top button