नगर : आग्रा किल्ल्यात शिवजयंती ऐतिहासिक बाब : ना. विखे | पुढारी

नगर : आग्रा किल्ल्यात शिवजयंती ऐतिहासिक बाब : ना. विखे

लोणी : पुढारी वृत्तसेवा :  छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीदिन आनंदोत्सवाचा सण आहे. संपूर्ण जगात आपल्या कर्तृत्वाने आदर्श विचारांची कीर्ती निर्माण करणार्‍या युगपुरुषाचा जयंतीदिन यंदा प्रथमच आग्रा किल्ल्यात साजरा होणे ही सर्वांसाठीच ऐतिहासिक व अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 व्या जयंती दिनानिमित्त ना.विखे यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पा. साखर कारखाना कार्यस्थळावर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान, जयंती उत्सवाचा मुख्य सोहळा लोणी बुद्रुक येथे साजरा झाला.

यावेळी सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, सोसायटी चेअरमन अशोक धावणे, गणेश मधुकर विखे, अनिल नानासाहेब विखे, अनिल एकनाथ विखे, राहुल धावणे, लक्ष्मण बनसोडे, प्रभाकर विखे, भाऊसाहेब विखे,शंकर विखे, भाऊसाहेब तुकाराम विखे, मयुर विखे, पंकज विखे, लक्ष्मण विखे, चांगदेव विखे, किशोर धावणे, नंदू राठी, विजय लगड, वसंतराव विखे, रामभाऊ विखे, वसंतराव विखे, भाऊसाहेब धावणे, अशोक धावणे, अ‍ॅड. नितीन विखे, संतोष विखे, भाऊसाहेब विखे आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवरा सैनिक स्कूलचे विद्यार्थी, स्काऊट- गाईडचे विद्यार्थी, घोडे पथक व डॉ.विखे पा. कारखाना बॅण्ड पथकाने पथसंचलन करून छत्रपती शिवाजी महाराजांना सलामी दिली. अहिल्याबाई होळकर माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितीतांची मने जिंकली.

यावेळी ना. विखे म्हणाले, महाराजांचा जयंतीदिन आम्हा सर्वासाठी सण आहे. संपूर्ण जगात आज महाराजांना अभिवादनाचे कार्यक्रम होत आहे. जगाच्या पाठीवर आपले कर्तृत्व व आदर्श विचारांची कीर्ती निर्माण करणार्‍या युगपुरुषाचा जयंतीदिन यंदा प्रथमच आग्रा येथील किल्ल्यात संपन्न होत आहे. हा ऐतिहासिक सोहळा सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.

लोणी खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ना.विखे यांनी पुष्पहार अर्पन करुन अभिवादन केले. यानिमित्त पारंपरिक खेळ पार पडले. यावेळी कारखाना संचालक संजय आहेर, ग्रामपंचायत सदस्य मायकल ब्राम्हणे, शरद आहेर, रविराज आहेर, मंगेश आहेर, सचिन आहेर, सुशांत आहेर, गणेश आहेर, रवींद्र आहेर यांच्यासह लोणी येथील शिवीप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.

जयघोषांनी उत्सवाचा आनंद झाला द्विगुणीत..!
मागील 33 वर्षांपासून ‘एक गाव एक शिव जयंती सोहळा’साजरा करण्यात येतो. ना. विखे व जि. प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या हस्ते पुतळ्याचे पुजन करून महाआरती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून या उत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.

Back to top button