नगर : ऊसतोड कामगारांची वैद्यकीय तपासणी | पुढारी

नगर : ऊसतोड कामगारांची वैद्यकीय तपासणी

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना व चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस तोडणी कामगारांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. अशी माहिती कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी सांगितले. ऊस तोडणी मजुरांसह कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांकडून देण्यात आले होते. त्यानुसार कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावरील ऊस तोडणी कामगारांची मोफत सर्वरोग निदान तपासणी शिबीर पार पडले.

उद्घाटन कारखाना व्हा.चेअरमन दिलीप बोरनारे यांच्या हस्ते झाले. यावेळी सुनील कोल्हे म्हणाले, ऊस तोडणी कामगार साखर कारखान्याच्या गळीत हंगामासह उद्योग समुहाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. ऊसतोडीच्या कष्टाच्या कामामुळे स्वत:सह कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे आजारांना सामोरे जावे लागू शकते. कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आ. अशोकराव काळे व चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीर पार पडले.
यावेळी सेक्रेटरी बाबा सय्यद, मुख्य शेतकी अधिकारी कैलास कापसे, डॉ. एस.आर.जैन, फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे, नितीन गुरसळ, मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे आदी उपस्थित होते. चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहा.वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत देसाई, डॉ. पुजा वाबळे, सहाय्यक आर. एच. शेख, आरोग्य सेविका व्ही. एल. तरोळे, गणेश पवार, शीतल म्हस्के, सीमा धेनक, वैशाली शेरमाळे, मीरा कापसे, मुक्ता गोधडे, उज्ज्वला निकम, आम्रपाली मेहेरखांब, सविता लोंढे व काळे कारखाना आरोग्य कर्मचार्‍यांनी शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

 

शिबिरात ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करून आजारांवर मोफत औषधोपचार देण्यात येणार आहेत. आरोग्य शिबिरात ऊस तोडणी कामगारांचा रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, गरोदर महिला व मुलांची मोफत तपासणी करण्यात आली.
                                                   – दिलीप बोरनारे, व्हा. चेअरमन

Back to top button