काष्टी : हातभट्टी, अवैध दारू, जुगार अड्ड्यांवर छापे; पोलिसांची कारवाई | पुढारी

काष्टी : हातभट्टी, अवैध दारू, जुगार अड्ड्यांवर छापे; पोलिसांची कारवाई

काष्टी; पुढारी वृत्तसेवा : काष्टी, जामदार मळा, श्रीगोंदा कारखाना, शहर, शंकरनगर पेडगाव, हिरडगाव फाटा, आनंदवाडी येथे हातभट्टी, अवैध दारू, जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. यामध्ये 38 जणांविरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये त्यांच्याकडून दोन लाख 19 हजार 510 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली हातभट्टी व अवैध दारू, जुगार अड्ड्यांवर कारवाईचे आदेश दिल्याने श्रीगोंदा तालुका हद्दीमध्ये कारवाई करण्यासाठी श्रीगोंदा पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली. 1 जानेवारीपासून 29 जानेवारीपर्यंत काष्टी, जामदार मळा, श्रीगोंदा कारखाना, शहर, शंकरनगर पेडगाव, हिरडगाव फाटा, आनंदवाडी येथे हातभट्टी, अवैध दारू, जुगार अड्यांवर छापे टाकण्यात आले.

जुगार संदर्भात 13 जणांविरोधात दोन गुन्हे दाखल करून चार हजार 200 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. श्रीगोंदा पोलिस हद्दीमध्ये माहिती मिळताच अवैध धंद्यावर छापे टाकून अवैद्य धंद्याचा बिमोड करण्याची धडक कारवाई चालू आहे, असे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी सांगितले. यामध्ये मागील वर्षी 2022मध्ये पोलिस हद्दीमध्ये, काष्टीसह श्रीगोंदा शहर, तालुक्यातील इतर गावांमध्ये वेळोवेळी हातभट्टी विक्री, देशी दारूवर छापा करून 262 आरोपींवर दारुबंदी कायद्यान्वये 259 गुन्हे दाखल करुन 12 लाख 71 हजार 859 रुपये चा मुद्देमाल जप्त केला आहे.

जुगार संदर्भात रेड करुन 136 जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये 50 गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून पाच लाख 14 हजार 603 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, सहायक पोलिस निरीक्षक, महेश जानकर समीर अभंग, अमित माळी, सुनील सूर्यवंशी पोलिस कर्मचारी आदींनी कारवाई केली.

Back to top button