खेड : इनोव्हा कारने ठोकरल्याने दुचाकीस्वार ठार | पुढारी

खेड : इनोव्हा कारने ठोकरल्याने दुचाकीस्वार ठार

खेड : कर्जत-बारामती राज्यमार्गावर आखोणी येथे भरधाव इनोव्हा कारने दुचाकीला ठोकरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. बबन महिपती सूळ (वय 57, रा.आखोणी, ता.कर्जत) असे अपघातातील मयताचे नाव आहे. बबन सूळ हे आपल्या दुचाकीवरून (एमएच 16 आरके 8197) राशीनकडून आखोणीच्या दिशेने येत होते.

यावेळी मागून भरधाव आलेल्या इनोव्हा गाडीने (एमएच 31 एफयू 2524) दुचाकीला ठोकरले. यात सूळ यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कल्याण सूळ यांच्या फिर्यादीवरून इनोव्हा चालक साईनाथ शंकर हळदेकर (रा. वाकर ता. भोकर जि. नांदेड) याच्याविरुद्ध कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल काळे हे करीत आहेत.

Back to top button