संगमनेर : शिक्षिकेला घातला सहा लाखांचा गंडा; महिलेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल | पुढारी

संगमनेर : शिक्षिकेला घातला सहा लाखांचा गंडा; महिलेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील अँग्लो उर्दू शाळेत कार्यरत असलेल्या महिला उपशिक्षिकेस नोकरीत कायम करण्याची ऑर्डर मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची तब्बल 5 लाख 80 हजार रुपयांना फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी अमिना सलीम शेख या महिलेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली मिळालेली अधिक माहिती अशी की, जोर्वे रस्त्यावरील फादरवाडी परिसरात राहणार्‍या शाहिस्ता मुजीबूर रहेमान शेख या शहरातील अँग्लो उर्दू शाळेत गेल्या दहा वर्षांपासून उपशिक्षिका म्हणून सेवेत आहेत.

सन 2019 मध्ये त्यांच्या शाळेतील अनुदानित शिक्षकाचे एक पद रिक्त झाले होते. त्या पदावर आपली नियुक्ती व्हावी, यासाठी संबंधित शिक्षिकेने सन 2021 मध्ये शाळेत अर्ज दाखल केला. त्यानुसार शाळा व्यवस्थापनाने कागदपत्रांसह जिल्हा परिषदेकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. सद रील गोष्ट अमिना सलीम शेख (रा. मुळ कुरण, ह. मु. मालदाड रोड) या महिलेला समजल्यानंतर तिने त्या शिक्षिकेला एका शहरातील एका हॉटेलमध्ये भेटण्यास सांगितले.

अमिना शेख यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेतून त्या महिलेने अनुदानित पदावरील नियुक्तीचे पत्र लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने त्या बहीण-भावाचा तिच्यावर विश्वास बसला. त्यानंतर 1 फेब्रुवारी 2021 रोजी त्या महिलेने त्या शिक्षिकेला फोन करुन काम सुरु करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. त्या शिक्षिकेचा त्या महिलेने अगोदरच विश्वास संपादन केला असल्यामुळे ऑनलाईन एक लाख रुपये त्या महिलेच्या खात्यावर पाठविले.

त्यानंतरही वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगत 17 मार्च 2022 पर्यंत त्या महिलेने सदरील शिक्षिकेकडून वेगवेगळी कारणे सांगत 5 लाख 80 हजार रुपयांची रक्कमउकळली. मात्र त्यानंतर ही अनुदानित पदावरील नियुक्ती बाबतच्या ऑर्डरबाबत विचारणा केली असता त्या महिलेकडून उडवाउडवी ची उत्तरे दिली जात होती. तसेच, संपूर्ण प्रशासन आपल्या पर्समध्ये असून आपले कोणीही वाकडे करु शकत नाही, अशी तिने धमकी दिली.

आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर त्या शिक्षिकेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याबाबतचा निर्णय घेतला. याबाबत श्रेष्ठ रहमान शेख यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अमिना सलीम शेख (रा.मूळ कुरण, हल्ली मालदाड रोड) या महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

आरोपी महिलेने केला होता एकावर खंडणीचा गुन्हा
संगमनेर शहरातील या शिक्षिकेची फसवणूक करणार्‍या महिलेने शहरातील शौकत पठाण या कथित पत्रकारावरती खंडणी मागितल्याचा आरोप करुन त्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला होता. आता त्याच महिलेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असल्यामुळे आता या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची दाट शक्यता आहे.

Back to top button