युनियन बँकेच्या राशीन शाखेतून 38 हजार चोरीस | पुढारी

युनियन बँकेच्या राशीन शाखेतून 38 हजार चोरीस

राशीन : पुढारी वृत्तसेवा : राशीन येथील युनियन बँकेच्या शाखेतून 38 हजार 500 रुपयांची रोकड लांबविण्याता आली. सकाळी 11 वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. राशीन येथील वसंत काळे हे युनियन बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी खात्यातून अडीच लाख रुपयांची रक्कम काढली. त्यानंतर ते पैसे मोजत असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला.

ती म्हणाली, तुम्ही येथे गर्दीत पैसे मोजण्यापेक्षा बाजूला बसून पैसे मोजा. त्यावेळी पैसे मोजण्याचा बहाणा करत त्या व्यक्तीने त्या रकमेमधील 38 हजार 500 रुपयांची रक्कम लंपास केली. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते.

Back to top button