नेवासा : ढेरे कुटुंबास शासकीय मदत देणार; खासदार सदाशिव लोखंडे; लोहगावात कुटुंबाची घेतली भेट | पुढारी

नेवासा : ढेरे कुटुंबास शासकीय मदत देणार; खासदार सदाशिव लोखंडे; लोहगावात कुटुंबाची घेतली भेट

नेवासा, पुढारी वृत्तसेवा: उसाच्या चार्‍यातून विषबाधा होऊन लोहगाव (ता.नेवासा) येथील शेतकरी रोहिदास ढेरे यांच्या गोठ्यातील 25 जनावरांचा दुर्दैवी मृत्यु झाला. खासदार सदाशिव लोखंडे यांनी रविवारी (दि.2) ढेरे कुटुंबाची भेट घेतली. राज्य शासनामार्फत त्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला आदेश देऊन सरकारच्या वतीने मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार लोखंडे यांच्या समवेत शिवसेनेचे माजी नेवासा तालुका प्रमुख व शिंदेसेनेचे प्रमुख बाळासाहेब पवार, भगवान गंगावणे, सुरेश डिके भाजपाचे प्रताप चिंधे, देविदास साळुंके, झापवाडीचे सरपंच वाघ, डॉक्टर कोरडे यावेळी उपस्थित होते. याप्रकरणी घटनेची सखोल चौकशी होऊन रोहिदास ढेरे या शेतकर्‍याला तातडीने शासकीय मदत मिळावी, यासाठी सोमवारी (दि.3) पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी चर्चा करून, घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहे. ढेरे कुटुंबास तातडीने सरकारी मदत मिळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला सूचना केल्याचे यावेळी खासदार लोखंडे यांनी सांगितले.

Back to top button