कुकाणा : पोलिस निरीक्षक करेंची बदली करा | पुढारी

कुकाणा : पोलिस निरीक्षक करेंची बदली करा

कुकाणा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत, कुकाणा येथील व्यापार्‍यांनी रस्ता रोको आंदोलन केले. तर, जाणता राजा युवा प्रतिष्ठानच्या वतीने गाव बंद आंदोलन करण्यात आले
पोलिस निरीक्षक करे यांच्या कार्यकाळात दरोडे, चोर्‍यांच्या घटना वाढल्या आहेत. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. करे हे अवैध धंद्येवाल्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यासाठी कुकाणा येथील व्यापार्‍यांनी आपले व्यवसाय बंद ठेवत नेवासा शेवगाव मार्गावरील कुकाणा बस थांब्याजवळ रस्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनात कुकाण्यातील आठवडे बाजार, त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे व्यवसाय सोडून इतर सर्व व्यवसाय दुपारी बारा वाजेपर्यंत बंद होते.वाहनांना अडथळा येऊ नये, यासाठी एका बाजूने सर्व वाहने सुरू ठेवण्यात आली होती. आंदोलकांचे शेवगाव पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठापर्यंत आंदोलकांच्या भावना कळविल्या जातील, असे आश्वासन दिले. यावेळी राहुल जावळे, विलास देशमुख, सुभाष चौधरी,लालजी बोरा, राजेंद्र बागडे, जवाहर भंडारी आदी उपस्थित होते.

Back to top button