पाथर्डी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन | पुढारी

पाथर्डी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदानात सार्वजनिक ध्वजारोहण करून आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. दरम्यान, शहीद मेजर अतुल गर्जे यांचे वडील उत्तम गर्जे, आई चंद्रकला गर्जे यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. रॅलीमध्ये पाथर्डी शहरातील श्री त्रिलोक जैन विद्यालय, बाबूजी आव्हाड महाविद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालयाचे विद्यार्थी तसेच रामराज्य ढोल ताशा पथक महसूल विभाग,पाथर्डी नगर परिषद, पोलिस विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, सहकार विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समितीचे सर्व विभागासह विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सार्वजनिक ध्वजारोहणासह रॅलीत सहभागी झाले होते.

रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी या वेळी वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या तर राजळे यांनी रॅलीत असलेल्या ढोल ताशा पथकात सहभागी होऊन ढोल सुद्धा वाजवला. वीर सावरकर मैदानावरून निघालेल्या रॅलीचा हुतात्मा स्तंभावर पुष्पवृष्टी करून समारोप करण्यात आला. या रॅलीत राजळे यांच्यासह प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, गोकुळ दौंड, माणिक खेडकर, सतीश गुगळे, डॉ. मनीषा खेडकर, संतोष लांडगे, डॉ. शारदा गर्जे, अमोल गर्जे, भारती काटुळे, सुरेश कुचेरिया, विष्णुपंत अकोलकर, मुकुंद लोहिया, धनंजय बडे, अशोक चोरमले, काकासाहेब शिंदे, रवींद्र वायकर, सुनील ओव्हळ, मंगल कोकाटे, शारदा हंडाळ, रमेश गोरे, संजय मरकड, देविदास मरकड, महेश बोरूडे, सचिन वायकर, जमीर आतार आदी सहभागी झाले होते.

Back to top button