बचत गटांतील महिलांचे सबलीकरण : आमदार नीलेश लंके | पुढारी

बचत गटांतील महिलांचे सबलीकरण : आमदार नीलेश लंके

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सबलीकरण व आर्थिक सक्षमीकरण झाले असून, मुलांच्या माध्यमातून त्यांना निश्चितच आर्थिक आधार दिला आहे. दुसरीकडे मला आमदार करण्यात महिलांचा सिंहाचा वाटा असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. महिला बचत गटासाठी पारनेर तालुक्यात आदर्श कार्यालय उभारण्यासाठी आमदारकीची ताकद उभी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाळवणी येथे राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त महिला मेळाव्याचे दीपप्रज्वलन आमदार लंके यांच्या हस्ते झाले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, बबलू रोहकले, राजेंद्र चौधरी, सरपंच लीलाताई रोहकले, सरपंच बापूसाहेब आवारी, सुनील कोकरे, जिल्हा व्यवस्थापक सरोदे, सोमनाथ जगताप, उडाणच्या समन्वयक अलका कदम आशा चेमटे, भारती चेमटे, सविता तोडमल, संचालक भाऊ साठे यांच्या उपस्थितीत महिलांना धनादेश वितरण आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले.

तालुक्यात ना कारखाना किंवा इतर मोठे उद्योग आणण्यापेक्षा गोरगरीब व गरजू रुग्णांचे अश्रू पुसण्यासाठी अद्ययावत रुग्णालय उभारण्याचे स्वप्न असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले. उडान अभियान माध्यमातून समुदाय गुंतवणूक निधींतर्गत 11 गटांसाठी 5 लाख रुपयांपर्यत एचडीएफशी बँकेच्या माध्यमातून वाटप करण्यात आले. 84 लाख रुपयांचे वाटप उमेद अभियाना अंतर्गत करण्यात आले.नागेश्वर व सिद्धिविनायक महिला व ग्रामस्थांच्या वतीने जिल्ह्यातील 20 लाख महिला या उमेद अभियानांतर्गत जोडल्या गेलेल्या आहेत.7 .50 लाख रुपये कर्ज देऊन प्रक्रिया व्यवसाय उद्योग देण्यात आले आहे.

आमदार लंके म्हणाले की, कष्टकरी व गरीब महिलांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत दिली पाहिजे. 953 बचत गटाच्या माध्यमातून 9 हजार 500 महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, या महिलांचा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी मी उभा राहणार आहे.

Back to top button